RCB win controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Sonu Nigam Tweet: 'आरसीबी जिंकल्यापासून काहीच चांगलं घडत नाहीये' सोनू निगमच्या ट्विटने सोशल मीडियावर वादळ

Sonu Nigam RCB Tweet: यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमनं केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलंय

Akshata Chhatre

Sonu Nigam Viral Tweet: यंदाच्या आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने इतिहास घडवत विजेतेपद पटकावलं. ३ जूनच्या दिवशी झालेल्या अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पंजाब किंग्सला नमवून त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक मोठा उत्सव ठरला, पण यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमनं केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलंय.

सोनू निगमचे वादग्रस्त ट्विट आणि उलटसुलट प्रतिक्रिया

सोनू निगमननं नुकतंच एक्सवर म्हटलंय, "जेव्हापासून आरसीबी आयपीएल जिंकली आहे, तेव्हापासून जगात काहीही चांगले घडत नाहीये." या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक युझर्सनी आरसीबीच्या विजयानंतर घडलेल्या काही दुर्दैवी घटनांची या ट्विटशी सांगड घातली. यात आरसीबीच्या विजय मिरवणुकीदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीचा समावेश आहे, ज्यात ११ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ३३ जण जखमी झाले होते.

या घटनेनंतर, १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारं एक विमान टेकऑफच्या दोन मिनिटांच्या आतच क्रॅश झालं, ज्यात २४२ लोकांचा जीव गेला. त्यानंतर १५ जून रोजी केदारघाटीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वैमानिकासह ७ जणांचा मृत्यू झाला. या सर्व घटनांना सोनू निगमने आरसीबीच्या विजयाशी जोडून त्यास अप्रत्यक्षपणे जबाबदार धरल्याने वाद निर्माण झाला आहे.

सोनू निगमच्या या टिप्पणीनंतर सोशल मीडियावर दोन गट पडलेत. एका गटातील लोक आरसीबीच्या बाजूनं बोलतायत, तर काही लोकांनी सोनू निगमच्या या विधानाला विनोद म्हणून घेतलंय. आरसीबीच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं, "ही चुकीची गोष्ट आहे, एका संघाने आयपीएल जिंकल्याने गोष्टी कशा बिघडू शकतात? एका चांगल्या गायकाकडून असे विधान, खूप वाईट गोष्ट आहे."

तर काहींनी "मला विश्वास बसत नाही की हे सोनू निगमनं हे लिहिलं" अशी प्रतिक्रिया दिली. "पहलगाम हल्ला झाला तेव्हा तर आरसीबी जिंकली नव्हती," अशी आठवणही एकाने करून दिली.

विनोद की गांभीर्य? चर्चा अजूनही सुरू

दुसरीकडे, सोनू निगमचा बचाव करणाऱ्यांनी लिहिले, "सर, आरसीबी चाहत्यांचा विनोदबुद्धी कमी आहे, कृपया सांभाळून राहा. तर दुसऱ्याने, "हा फक्त एक विनोद होता, याला जास्त गंभीरपणे घेऊ नका," असं लिहिलं. सोनू निगमने हे विधान केवळ विनोदाने केले होतं की त्यामागे काही गंभीर विचार होता, यावर सोशल मीडियावर अजूनही जोरदार चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT