Sidharth Shukla And Shehnaaz Gill Dainik Gomantak
मनोरंजन

Sidharth Shukla: आता मी कसं जगू? सिद्धार्थच्या अचानक जण्याने शहनाज गिलला दुःख अनावर

बॉस मुळेच सिद्धार्थ शुक्लाच्या आयुष्यात शहनाज गिल आली होती

दैनिक गोमन्तक

सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूच्या बातमी मुळे पूर्ण इंडस्ट्री हळहळी आहे. अनेक कलाकरांनी सोशल मीडियावर (social media) त्याला श्रद्धांजली वाहिली आणि दुख व्यक्त केलं. सलमान खान, करण जोहर, अनिल कपूर, अली गोनी, अजय देवगण, अक्षय कुमार, कपिल शर्मा, विंदू दारा सिंह, मनीष पॉल यांच्यासह अनेकांना अभिनेत्याच्या (Actor) निधनामुळे धक्का बसला आहे. अवघ्या वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचा मृत्यू झाला.

लोकप्रिय टीव्ही आणि चित्रपट अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गुरुवारी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ आर सुखदेवे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये मृत आणण्यात आले होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यापासून इंटरनेटवर दु: ख आणि शोक व्यक्त केला जात आहे. बिग बॉस 13 जिंकल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.बिग बॉस मुळेच सिद्धार्थ शुक्लाच्या आयुष्यात शहनाज गिल आली होती. या दोघांनी मीडिया समोर कधीच आपल्या नात्याची कबुली दिली नाही परंतु, बिग बॉसमुळे ते समजासमोर येतच होते. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जण्याने शहनाज गिल ही मानसिक धक्क्यात आहे. अशी माहिती तिच्या वाडीलांनी दिली.

दुर्दैवी बातमी ऐकल्यानंतर, अनेक सेलिब्रिटी आणि सिद्धार्थचे सहकारी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सोशल मीडियावर येऊन आपले दुख व्यक्त केले. कॉमेडियन कपिल शर्माने सुद्धा ट्वीट केले, "हे देवा, हे खरोखरच धक्कादायक आहे आणि हृदयद्रावक आहे". ओम शांती, तर क्रिती खरबंदाने लिहिले, “शब्द नाहीत. हे फक्त हृदयद्रावक आहे. ”

मुंबईचे राहणारे, सिद्धार्थ शुक्ला यांनी 2008 मध्ये हिंदी टीव्ही शो बाबुल का आंगन चूटे ना मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. कलर्स टीव्ही शो बालिका वधूमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना पहिले मोठे यश मिळाले. त्यानंतर खतरों के खिलाडी, इंडियाज गॉट टॅलेंट आणि बिग बॉसचे अनेक सीझन यासारख्या अनेक रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमध्ये त्याने दमदार काम केले. तो बिग बॉस 13 चा विजेता होता आणि अलीकडेच बिग बॉस ओटीटीमध्ये शहनाज गिलसोबत दिसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT