Sidharth Malhotra in Shershaah movie Twitter/@hourlyvd
मनोरंजन

Shershaah Teaser: सिद्धार्थ ​​आणि कियाराचा चित्रपट होणार OTT वर प्रदर्शित

बॉलिवूड (bollywood) मधील अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) ‘शेरशाह’ (Shershaah) या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (bollywood) मधील अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) ‘शेरशाह’ (Shershaah) या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण आज सिद्धार्थने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(Siddharth Malhotra and Kiara Advani film Shershaah will come on OTT platform)

सिद्धार्थने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेसह सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिले - हीरो त्यांच्या कथांमधून जगतो. आम्ही तुमच्या कारगिल वॉर हीरो कॅप्टन विक्रम बत्राची कहाणी समोर आणून अभिमान वाटत आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खूप लांबचा प्रवास आहे आणि मला या भूमिकेचा अभिमान आहे. शेरशाह 12 ऑगस्ट रोजी ॲमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

व्हिडिओमध्ये कारगिल वॉरच्या वास्तविक फुटेजची काही झलक दाखविली आहे. त्याने शत्रूंचा धूर कसा केला होता. व्हिडिओमध्ये कॅप्टन विक्रम बत्राच्या काही क्लिप्सदेखील दाखवल्या आहेत ज्यामध्ये तो बोलत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर या चित्रपटात विक्रम बत्राच्या भूमिकेत दिसणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राची एन्ट्री आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणारा हा चित्रपट तुमच्यात देशभक्ती जागृत करेल.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्यासमवेत शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांश अशोक मल्होत्रा, निकितन धीर, अनिल चटर्जी, साहिल वैद आणि पवन चोप्रा असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात सिद्धार्थ डबल रोलमध्ये दिसणार आहे.

बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिद्धार्थ मल्होत्राने चाहत्यांना चित्रपटाशी संबंधित अनाउंसमेंट करण्याचे संकेत दिले होते. त्याने ट्वीट केले होते की शेरशहाने डेल्टाला सांगितले की माझे डोळे 150,721 च्या टारगेटवर आहे. मी तुमच्या सिग्नलची वाट पाहत आहे.सिद्धार्थच्या या ट्विटनंतर त्याच्या चाहत्यांनी असा अंदाज बांधण्यास सुरूवात केली की तो त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 2 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे तसे होऊ शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT