Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

"तो असा स्टार होता जो अंडरवर्ल्डसमोर झुकला नाही" निर्मात्याने केलं शाहरुखचं कौतुक

सध्या शाहरुख जवानच्या तुफान यशामुळे सोशल मिडीया आणि चाहत्यांंमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. नुकतंच एका दिग्दर्शकाने शाहरुखचं कौतुक केल्याने शाहरुख पुन्हा

Rahul sadolikar

अभिनेता शाहरुख खानचा जवान सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी 200 कोटींचा आकडा पार केला.

सगळीकडून शाहरुखच्या जवानचं कौतुक होत असताना एका निर्मात्याने शाहरुखच्या एका गोष्टीचं कौतुक केलं आहे

जवानचा कल्ला

साउथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलीवूडपर्यंत कौतुकाचा वर्षाव होत असताना आता, चित्रपट निर्माते संजय गुप्तांनी जवान पाहिल्यानंतर शाहरुखचं एका गोष्टीसाठी कौतुक केलं आहे.

निर्माते संजय गुप्तांनी नुकताच जवान पाहिला, त्यांनी शाहरुखचे कौतुक करत सांगितले त्याच्या आयुष्यातील विविध आव्हानांवर मात कशी केली. 

1990 च्या दशकात अंडरवर्ल्डच्या गुंडगिरीपुढे झुकण्यास शाहरुखने नकार दिला. या गोष्टीची आठवण सांगत गुप्ता यांनी शाहरुखच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.

संजय गुप्ता यांचं ट्विट

X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) संजय गुप्ता यांनी लिहिले, "मी जवान पाहिला. मला हे शेअर करणे भाग पडले. 90 च्या दशकात जेव्हा फिल्म स्टार्सची अंडरवर्ल्ड गुंडगिरी शिगेला पोहोचली होती तेव्हा @iamsrk हा एकमेव स्टार होता जो कधीही झुकला नाही.

'गोली मारनी है मार दो, पर तुम्हारे लिए काम नहीं करूंगा. मैं पठान हूं '. तो म्हणाला होता . आजही तेच."

गुप्ता म्हणाले

जवान पाहिल्यानंतर शाहरुखबद्दल बोलताना संजय गुप्ता यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, "जवानमधील संपूर्ण बोट मोनोलॉग ही गेल्या दहा वर्षांतील आमच्या चित्रपटातील सर्वात धाडसी गोष्ट आहे. हॅट्स ऑफ टू द मॅन विथ अ स्पाइन ऑफ स्टील."

जवानने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला कारण त्याने अवघ्या तीन दिवसांत ₹ 200 कोर क्लबमध्ये प्रवेश केला. फक्त 3 दिवसांत 200 कोटींंचं कलेक्शन पार करणारा तो पहिलाच चित्रपट ठरला.

शाहरुखचं ट्वीट

जवान पाहिल्यानंतर चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिसादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना , शाहरुखने X वर एक नोट शेअर केली. त्याने लिहिले, "#Jawan साठी सर्व प्रेम आणि कौतुकाबद्दल धन्यवाद!! सुरक्षित आणि आनंदी रहा...

कृपया सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत रहा तुम्ही चित्रपटांचा आनंद घेत आहात.... आणि मी ते सर्व पाहण्यासाठी लवकरच परत येईन! तोपर्यंत... चित्रपटगृहांमध्ये जवानांसोबत पार्टी करा!! खूप प्रेम आणि कृतज्ञता!"

जवानची तुफान कमाई

आतापर्यंत, जवानाने भारतात ₹ 202.73 कोटी आणि जगभरात ₹ 350 कोटी कमावले आहेत. जवानमध्ये शाहरुख नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत दिसत आहे.

 संजय दत्त आणि दीपिका पदुकोण यांच्या छोट्या भूमिका आहेत. प्रियामणी, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान आणि आलिया कुरेशी देखील या चित्रपटाचा भाग आहेत.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT