Brahmastra Dainik Gomantak
मनोरंजन

ब्रह्मास्त्रमधील किंग खानचा 'secret look' झाला लीक; 'ते' रुप बघून चाहते खुश-Video

व्हायरल क्लिपमध्ये शाहरुख रक्ताने माखलेल्या अवतारामध्ये दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

आलिया भट्ट (Alia Bhatt), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुख्य भूमिकेत असलेला ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपट निर्माता अयान मुखर्जीने सिनेफिल्सची उत्सुकता आनखीणच वाढवली आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर, अनेकांनी असा अंदाज लावला की सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपटामध्ये कॅमिओ आहे. (Shah Rukh Khan secret look video from Brahmastra has been leaked online)

जूनमध्ये, SRK च्या चाहत्यांनी ट्रेलरमधील स्क्रीनशॉट शेअर केले आणि आश्चर्य वाटले की हा किंग खान आहे जो वायुच्या रूपामध्ये दिसून येत आहे. आणि आता असे दिसते की चाहत्यांनी केलेले निरीक्षण योग्य आहे. गुरुवारी, नेटिझन्सनी ब्रह्मास्त्रमधील एसआरकेचा लूक असल्याचा दावा करत एक नवीन चित्र आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल क्लिपमध्ये शाहरुख रक्ताने माखलेल्या अवतारामध्ये दिसत आहे. जसजसे SRK चे पात्र हवेत उंचावेल तसतसे भगवान हनुमानाचे सिल्हूट दिसू लागते. या खास झलकमुळे शाहरुखचे चाहते खूप खूश झाले आहेत.

"शाहरुख खान सोबत झिरोमध्ये काम करताना मी रॉकेट्रीबद्दल सांगितले होते... एका वाढदिवसाच्या पार्टीत त्यांनी मला चित्रपटाबद्दल विचारले होते आणि चित्रपटाचा भाग बनण्याची इच्छा व्यक्त केली होती, हे मला स्पष्टपणे आठवले. 'मुझे पार्श्वभूमी में कोई भी भूमिका चलेगा मैं फिल्म का हिसा होना चाहता हू', खान साहेबांनी मला सांगितले होते. मला वाटले की ते विनोद करत आहेत पण दोन दिवसांनी माझी पत्नी सरिताने मला खान साहेबांचे त्यांच्या प्रेमळ शब्दांसाठी आभार मानायला सांगितले आणि मी एक त्यांना मेसेज टाकला.

खान साहेबांच्या मॅनेजरकडून मला लगेच एक मजकूर आला की, 'खान साहब तारीखें पूछ रहे हैं शूट की'.. आणि अशा प्रकारे तो आमच्या चित्रपटाचा एक भाग बनला," माधवन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, "दोघांनी (एसआरके आणि सुरिया) चित्रपटातील त्यांच्या कामासाठी एक पैसाही आकारला नाही तसेच त्यांनी कारवां, वेशभूषा आणि सहाय्यकांसाठी काहीही शुल्क घेतलेले नाहीत."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: राज्यात पावसानं पुन्हा उडवली दाणादाण, पर्वरीत वाहनधारकांची त्रेधातिरपिट; चिखलामुळे वाहतूक कोंडी!

Goa Live Updates: वाळपईत पावसाचं धूमशान

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'सोमवारपर्यंत चौकशी आयोग नेमा अन्यथा...'; कॅश फॉर जॉब प्रकरणी पाटकरांचा सावंत सरकारला अल्टिमेटम

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT