Shivamogga Subbanna
Shivamogga SubbannaDainik Gomantak

Shivamogga Subbanna: कन्नड गायक शिवमोग्गा सुब्बाना यांचे निधन

Shivamogga Subbanna Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध कन्नड गायक शिवमोग्गा सुब्बाना यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Published on

Kannada Singer Shivamogga Subbanna Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध कन्नड गायक शिवमोग्गा सुब्बाना यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. शिवमोग्गा यांच्या कुटुंबातील निकटवर्तीयांनी ही दुःखद बातमी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमोग्गा सुब्बाना यांना शहरातील जयदेव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

शिवमोग्गा सुब्बाना हे वकीलही आहेत

शिवमोग्गा सुब्बाना (Shivamogga Subbanna) हे पहिले कन्नड भाषेतील गायक होते, ज्यांना पार्श्वगायनासाठी 1978 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'कडू कुदुरे' चित्रपटातील (Movie) 'कडू कुदुरे उडी बंदित्ता' या गाण्यासाठी त्यांना हा सन्मान मिळाला. शिवमोग्गा हे कन्नड संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात. संगीत क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी वकील म्हणून काम केले. त्याचबरोबर ते ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचे गायकही राहिले आहेत.

Shivamogga Subbanna
अनुराग कश्यप म्हणाले, निर्माते 'बॉयकॉट'ला घाबरतात, मृत्यूच्या 2 वर्षांनंतरही सुशांत सिंह राजपूत...

या पुरस्कारांनी सन्मानित

शिवमोग्गा सुब्बाना यांनी प्रसिद्ध कन्नड कवी कुवेम्पू (केव्ही पुट्टप्पा), केएस नरसिंह स्वामी, दा रा बेंद्रे आणि इतरांच्या कवितांसाठी रागांची रचना केली. 14 डिसेंबर 1938 रोजी जन्मलेल्या सुब्बाना यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. 1978 मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर 2006 मध्ये कन्नड कंपू पुरस्कार, 2008 मध्ये कुवेम्पू विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट आणि 2009 मध्ये सुंदर श्री पुरस्कार देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com