Heeramandi Updates Dainik Gomantak
मनोरंजन

Heeramandi Movie Updates: पावसाळ्यापूर्वीच हिरामंडीचं शूट पूर्ण होणार? संजय लीला भन्साळी म्हणाले...

संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीची कथा आणि पात्रं उत्सुकता ताणवत आहेत...आता या सिरीजची अपडेट समोर आली आहे.

Rahul sadolikar

Sanjay Leela Bhansali's Heeramandi Movie Updates: संजय लीला भन्साळी हे दिग्दर्शनातील परफेक्शनिस्ट म्हणुन ओळखलं जातं. चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं स्टारोटेलिंग म्हणजेच चित्रपटाची कथा सांगण्याची पद्धत गोष्टीसाठी संजय लीला भन्साळींची स्टाईल प्रेक्षकांना आवडते, त्याची बरीच उदाहरणं सांगता येतील.

हम दिल दे चुके सनम, पद्मावत, बाजीराव मस्तानी हे चित्रपट भन्साळी यांच्या गोष्ट सांगण्याच्या शैलीचं नेमकं उदाहरण म्हणता येईल.

सध्या भन्साळींच्या हीरामंडी या चित्रपटाची मनोरंजन विश्वात चर्चा सुरू आहे. सध्या मुंबईत सुरू असलेलं चित्रपटाचं शूटींगमध्ये पावसाळ्यात अडथळा येण्याचा धोका आहे.

मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा, संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमीका असणारा या चित्रपटाचा शेवटचा टप्पा गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भन्साळी हे शूटिंग पूर्ण करण्यासाठी प्रचंड व्यस्त आहेत,त्यांना या चित्रपटाचं शूटींग पावसाळ्याआधी आटोपून घ्यावं लागणार आहे कारण जूनमध्ये मान्सून मुंबईत दाखल होतो.

Sanjay Leela Bhansali's Heeramandi Updates

स्वातंत्र्यपूर्व भारतातील गणिकांभोवती फिरणाऱ्या या सिरीजचं दोन महिन्यांचे काम बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुत्रांनी सांगितले  “2022 च्या शेवटी जेव्हापासुन मिताक्षरा कुमारसह त्यांच्या एका सह-दिग्दर्शकाला काम सोपवल्यापासुन संजय सर गेल्या पंधरवड्यापासून दररोज सेटवर येत आहेत". 

लाईटपासून कॉस्च्यूम आणि परफॉर्मन्सपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर ते देखरेख करत आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी शूटींग पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे,” .

नेटफ्लिक्सच्या या सिरीजने संजय लीला भन्साळी यांनी डिजिटलवर एन्ट्री केली आहे . 2022 च्या शेवटी सिरीजवर काम सुरू झाले होते. टीमसाठी जून-अखेरपर्यंत वेळ आहे ;पण त्यासाठी खूप वेगाने काम सुरू ठेवावे लागेल.

प्रॉडक्शन टीमने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) कामगारांना जूनच्या पहिल्या आठवड्यात मोठे मचान(scaffolding ) सुरू करण्याची सूचना दिली आहे, त्यामुळे त्याच्या भव्य सेटला नुकसान होण्यापासून रोखले जाईल. “सगळे आऊटडोअर शॉट्स पूर्ण झाले आहेत, इनडोअर सीन्स शूट करणे बाकी आहे. टीम खूप तास काम करत आहे आणि दिवसातून अनेक सीन शूट करत आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोहली म्हणाला, ''रुको, मार्कर लेके आता हूँ!'' 4 तास घराबाहेर बसलेल्या चाहत्यासाठी स्वतः धावला; किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, 'हाच खरा किंग'

Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

मनोज परबांपेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम, घाटी – घाटी करुनच त्यांचा आमदार निवडून आला; मेटींचा पलटवार

Bird week in India: 'चला, पक्षी वाचवूया, निसर्ग जपूया'! पक्षीशास्त्राचे जनक 'डॉ. सलिम अली' यांचे स्मरण

Serendipity Art Festival: देऊस नोस आकुडी, डबल बील; सेरेंडिपिटी कला महोत्सवातील विशेष नृत्य सादरीकरणे

SCROLL FOR NEXT