बॉलिवूड हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतं. कधी कधी चित्रपटांची चर्चा तर कधीकधी कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्याचीही चर्चा होत असते, यात कधीकधी कलाकारांच्या अफेअर्सची चर्चाही जोर धरू लागते.
ही चर्चा आताच नाही तर अगदी पूर्वीपासुन होत आली आहे. सध्या सोशल मिडीयावर राजेश खन्ना, बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर आणि एका अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे. कोण आहे ती अभिनेत्री आणि नेमकी काय आहे ही चर्चा चला जाणुन घेऊया.
दोघांमध्ये वयाचे अंतर होते, पण असे असतानाही डिंपल आणि राजेशचे लग्न झाले. ही जोडी चाहत्यांची लाडकी होती. राजेश खन्ना डिंपलच्या प्रेमात इतके मग्न झाले होते की, त्या काळातील सर्वात मोठे निर्माता-दिग्दर्शक राज कपूर यांच्याशी त्यांचे वैर घेतले होते. राजेश आणि राज कपूर यांच्यातील वैराचे कारण काय होते ते जाणून घेऊया.
डिंपल कपाडियाने ज्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तो 'बॉबी' राज कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. बॉबी या चित्रपटात ऋषी कपूर डिंपलसोबत दिसले होते. डिंपलचे वडील चुन्नीभाई कपाडिया यांनी आपल्या मुलीच्या बॉलिवूडमध्ये लाँचिंगसाठी एक मोठी पार्टी आयोजित केली होती.
राजेश खन्ना यांच्यासह अनेक दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली. राजेश खन्ना यांनी जेव्हा डिंपलला पहिल्यांदा पाहिलं, त्याचवेळी ते डिंपल कपाडियावर फिदा झाले होते. त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटात डिंपलला घ्यायचे होते. मात्र, 'बॉबी' प्रदर्शित होईपर्यंत डिंपल दुसरा कोणताही चित्रपट करू शकत नसल्याचे राज कपूर यांनी स्पष्ट केले होते. याच कारणावरून राजेश खन्ना आणि राज कपूर यांच्यात वाद झाला.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया एकमेकांना डेट करू लागले. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. पुढे राजेश आणि डिंपलचे लग्न झाले. यानंतर राजेश खन्ना 'बॉबी'च्या शूटिंगमध्ये अडचणी निर्माण करू लागले.
डिंपलने ऋषी कपूरसोबत काम करावे अशी राजेश खन्ना यांची इच्छा नव्हती. जरी नंतर बॉबी रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. मात्र, तोपर्यंत राजेश खन्ना आणि राज कपूर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.