Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Upcoming Movie : सलमानच्या घरच्यांनाच नाही आवडला त्याचा आगामी चित्रपट, आता होणार बदल

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट त्याच्या घरच्या मंडळींनाच नाही आवडला

Rahul sadolikar

अभिनेता सलमान खान म्हणजेच बॉलिवूडचा भाईजान त्याच्या फॅन्ससोबत घरच्यांचाही खूप लाडका आहे. आपल्या कुटूंबियांशी सलमानचे नाते खूप हळवे आहे. त्यामुळेच त्याच्या चित्रपट आणि करिअरच्या बाबतीतही कुटूंबियांचा सल्ला तो महत्वाचा मानतो.

अगदी चित्रपटांच्या कथेच्या बाबतीत सलमान वडील आणि दिग्गज चित्रपट लेखक सलीम खान यांचा सल्ला घेतो. मिळालेल्या माहितीनुसार सलमानचा आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जान त्याच्या कुटूंबियांनाच आवडला नाही, चला बघुया नेमकं काय मत आहे सलमानच्या कुटूंबियांचं.

सलमान खान आणि पूजा हेगडे स्टारर 'किसी का भाई किसी की जान' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित, या चित्रपटाचे पहिले गाणे, नयो लगदा, आजकाल इंस्टाग्रामवर त्याच्या रील्समुळे खूप लोकप्रिय झाले आहे. 'किसी का भाई किसी की जान' हा चाहत्यांसाठी खूप महत्वाचा चित्रपट समजला जातोय . 

महत्वाचे म्हणजे बॉक्स ऑफिसवर सलमान खानचं कमबॅक कसं होणार हे प्रत्येकाला पाहायचे आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा लांब केसांमध्ये दिसणार आहे. बॉक्स ऑफिसवर पद्धतीने सलमान खानही सावकाश पाऊल टाकत आहे. याबाबतीत त्याला कोणताही धोका पत्करायचा नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने 'किसी का भाई किसी की जान' त्याचे कुटुंब, मित्र आणि जवळच्या लोकांना दाखवले आहे. त्यांने याबाबतीत सर्वांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत . यानंतर जे काही दोष त्यांच्या लक्षात आले आहेत, त्यामुळे आता एडिटिंगमध्येही बदल होणार आहे. 

'किसी का भाई किसी की जान' हा असा चित्रपट व्हावा ज्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळेल अशी त्याची इच्छा आहे. साहजिकच भाईजान घरच्या मंडळींच्या विरोधात जाणार नाही.

सलमानने चित्रपटाचे एडिटिंग नुकतंच पूर्ण केलं असून पहिला कट तयार आहे. त्याने भाऊ सोहेल खानच्या स्टुडिओत एडिटिंग फर्स्ट हाफ पूर्ण केला. त्याच्या एडिटिंगमधुन ब्रेक घेतला कारण तो काही विवाहसोहळ्यांमधल्या परफॉर्मन्सने थकला होता. आता बघुया सलमानचा हा बदललेला भाईजान कसा असणार आहे ते?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT