Madhuri Dixit : "डॉ. नेनेंसोबत लग्न करणं सोपं नव्हतं"! माधुरी असं का म्हणाली?

अभिनेत्री माधुरी दिक्षीतने डॉ श्रीराम नेनेंशी लग्न करणं सोपं नव्हतं असं म्हटलं आहे
Madhuri Dixit
Madhuri Dixit Dainik Gomantak
Published on
Updated on

धकधक गर्ल माधुरील कोण ओळखत नाही? माधुरी दीक्षितला परिचयाची गरज नाही. ती बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत माधुरीने इंडस्ट्रीमध्ये काही उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले आहेत. मात्र, तिने लग्नासाठी करिअर सोडले. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर ती अमेरिकेत शिफ्ट झाली. 

अतीशय चांगलं करिअर घडवुन मग माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. माधुरीच्या लग्नाला आता 23 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या दोघांना अरिन नेने आणि रायन नेने ही दोन मुले आहेत.

माधुरी दीक्षित म्हणाली डॉ नेनेंशी लग्न करणं सोपं नव्हतं, “हे कठीण आहे कारण मग तुम्हीच मुलांची काळजी घेत आहात, त्यांना शाळेत नेत आहात, त्यांना परत आणत आहात आणि अशा बऱ्याच गोष्टी. डॉ नेनें बाबतीत बोलताना माधुरी म्हणाली कितीही महत्वाची गोष्ट असली तरी पण तुम्ही तिथे कदाचित नसाल, कारण डॉ. नेने हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या कोणाची तरी काळजी घेत असतात. कधीकधी मी आजारी असू शकते आणि तुम्हाला दुसऱ्याची काळजी घ्यावी लागेल. या गोष्टी आहेतच. 

पण मला वाटते की हे खूप आनंददायक आहे आणि मला नेहमीच तुमचा खूप अभिमान वाटायचा कारण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला पाहिले की तुम्ही ज्या रुग्णांची काळजी घेत आहात किंवा त्यांच्या हक्कांसाठी लढत आहात त्यांच्याबद्दल तुम्हाला खूप काळजी आहात ... "

Madhuri Dixit
Vaheeda Rehman : 'वहिदा रहमान' यांचे पांढरे केस पाहुन सुनिल दत्त यांना ICU मध्येच...

ती पुढे म्हणाली, “माझ्या मनाला माहीत आहे, तूम्ही खूप चांगली व्यक्ती आहात. वैवाहिक जीवनात जोडीदाराला ओळखणे महत्त्वाचे असते. आमच्याकडे नेहमीच अशी भागीदारी होती जिथे आम्ही एकमेकांची काळजी घेत होतो आणि मुलांची नेहमी काळजी घेतली जाते आणि नेहमीच प्रेम आणि काळजी महत्त्वाची असते. 

असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला माहित असते की आपण जीवनात जे काही करत आहोत ते चांगल्यासाठी आहे आणि आपल्या दोघांनाही हवे आहे.” थोडक्यात माधुरी समजुतदार गृहीणीसारखी तिच्या संसारात रमलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com