Actor Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

अरबाज खानच्या शोमध्ये ट्रोलर्सला सलमानने दिले उत्तर

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आपल्या टॉक शो 'पिंच' (Pinch) च्या पुढच्या भागात झळकणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आपल्या टॉक शो 'पिंच' (Pinch) च्या पुढच्या भागात झळकणार आहे. या शोमध्ये सेलेब्रिटींनी (celebrities) ट्रॉल्सच्या कमेंट वाचून आपले मत मांडतात. बुधवारी या शोचा प्रोमो व्हिडिओही सोशल मीडियावर (Social media) शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान, अनन्या पांडे, आयुष्मान खुराना, कियारा अडवाणी आणि फराह खान दिसत आहेत. यादरम्यान अरबाज ट्रॉल्सच्या कमेंट्सवर आपल्या भावासोबत आणि इतर कलाकारांशी बोलत आहे. व्हिडिओ सलमान खानवर (Salman Khan) केलेल्या कमेंट्सपासून सुरू झाला आहे.(Salman Khan replied to the troll on Arbaaz khans show)

सलमान खानचा भाऊ आणि शो 'पिंच' चे होस्ट अरबाज खान सलमानवर केलेली कमेंट वाचतात "लोकांचे देव होऊ नका." सलमानने यावर प्रतिक्रिया दिली: "ते बरोबर आहे, फक्त एकच देव आहे आणि तो मी नाही." व्हिडिओमध्ये सलमानने दुसऱ्या एका ट्रोलच्या कमेंटला उत्तर दिले: "आमच्या पोस्टमध्ये ते काय दिसले जे आमच्या घराचे आहे. त्यांना माझं घर अय्याशी चा अड्डा का वाटतो ?" यादरम्यान सलमान खानने सर्व कमेंट्सचे उत्तर अत्यंत गांभीर्याने दिले.

सलमान खान व्यतिरिक्त या वेळी अनन्या पांडे स्वत: बद्दलची कमेंट वाचते, ज्यावर असे लिहिले आहे की तिने आपले नाव 'फेक पांडे' ठेवावे. दुसरीकडे, फराह खानने नेपोटिझमच्या कमेंटवर उत्तर दिले. "तुम्ही नेपोटिझम बद्दल बोलता,पण तुम्हाला तर शाहरुख खानच्या मुलीचा फोटो किंवा करिनाच्या मुलाचा फोटो पाहायचा असतो." आम्ही तुम्हाला सांगतो की अरबाज खानच्या या शोचा पहिला सीझन खूपच आवडला होता. आणि हेच कारण आहे की तो दुसऱ्या सत्रात देखील जोरदार तयारीला लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT