Salman khan matrubhoomi postponed Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Matrubhoomi: दबंग सलमान खान पुन्हा अडचणीत, बहुचर्चित 'मातृभूमी' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; 'हे' कारण आले समोर

Salman Khan Matrubhoomi Release Date: चित्रपटाच्या टीमने सुरुवातीला प्रशांतचे सीन पुन्हा शूट करण्याचा विचार केला होता. मात्र, त्यांच्या भूमिकेत मोठे अ‍ॅक्शन सीक्वेन्स असल्यामुळे ते सहज शक्य नाही.

Sameer Panditrao

बॉलिवूडमध्ये सध्या सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार असलेला हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुढे ढकलण्यात आला आहे. स्क्रिप्टमध्ये काही महत्त्वाचे बदल आणि अनपेक्षित अडचणींमुळे मेकर्सना हा निर्णय घ्यावा लागला आहे.

या विलंबामागे एक मोठं आणि धक्कादायक कारण म्हणजे प्रशांत तमांग यांचे अचानक निधन. ‘Indian Idol 3’चे विजेते असलेले प्रशांत या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार होते. त्यांनी काही महत्त्वाचे सीन शूटही केले होते, मात्र अजून बरीच शूटिंग बाकी होती. जानेवारी 2026 मध्ये त्यांचा कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाला आणि संपूर्ण टीमसमोर मोठं आव्हान उभं राहिलं.

चित्रपटाच्या टीमने सुरुवातीला प्रशांतचे सीन पुन्हा शूट करण्याचा विचार केला होता. मात्र, त्यांच्या भूमिकेत मोठे अ‍ॅक्शन सीक्वेन्स असल्यामुळे ते सहज शक्य नाही. केवळ क्लोज-अप शॉट्स बदलणे सोपं असलं तरी संपूर्ण भूमिकेची पुनर्रचना करणे अत्यंत अवघड ठरत आहे. त्यामुळे मेकर्ससाठी हा निर्णय आर्थिक आणि क्रिएटिव्ह दोन्ही पातळ्यांवर महागात पडत आहे.

दरम्यान, सलमान खान यांच्या डेट्स आणि त्यांच्या लूकची सातत्यता राखणं हेही एक मोठं आव्हान ठरत आहे. काही काळासाठी टीमने दुसऱ्या अभिनेत्याला घेण्याचा पर्यायही विचारात घेतला. तसेच, एआय आणि VFX च्या मदतीने प्रशांत यांचा चेहरा वापरण्याचाही पर्याय चर्चेत आहे. मात्र, यासाठी त्यांच्या कुटुंबाची परवानगी आवश्यक आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले असून, चित्रांगदा सिंग या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या मेकर्स लवकरात लवकर शूट पूर्ण करून पोस्ट-प्रोडक्शन सुरू करण्याच्या तयारीत आहेत. नवीन रिलीज डेट जाहीर झालेली नसली तरी, चित्रपटाची देशभक्तीची थीम लक्षात घेता तो स्वातंत्र्यदिनाच्या आसपास प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूणच, ‘मातृभूमी’ हा चित्रपट आता केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, पडद्यामागील संघर्षामुळेही चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT