Bhoot Bangla: हातात रुद्राक्ष, डोळ्यांना गॉगल! अक्षयच्या 'भूतबंगला' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज; फॅन्स म्हणाले "अक्षय इज बॅक"

Bhoot Bangla Motion Poster: ‘भूत बंगला’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावर त्याचा मोशन पोस्टर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे.
Bhoot Bangla movie 2026
Bhoot Bangla movie 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा मिलाफ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूत बंगला’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावर त्याचा मोशन पोस्टर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. यामागील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची तब्बल १४ वर्षांनंतर एकत्र आलेली जोडी.

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक गाजलेल्या कॉमेडी चित्रपटांची मेजवानी दिली आहे. ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’ आणि ‘गरम मसाला’सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यामुळेच ‘भूत बंगला’कडूनही प्रेक्षकांना जुन्या शैलीतील टायमिंग, संवादफेक आणि विनोदाची अपेक्षा आहे. या जोडीचे पुनरागमन म्हणजे कॉमेडीप्रेमींसाठी खास पर्वणी मानली जात आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये अक्षय कुमार वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. रुद्राक्षांची माळ घातलेले, भयानक चेहऱ्यांनी सजलेल्या आणि शिंगांनी अलंकृत सिंहासनावर बसलेले अक्षय एकाच वेळी भीती आणि विनोदाची छटा निर्माण करतात. त्यांच्या चेहऱ्यावरची खास स्मितरेषा आणि हावभाव पाहता चित्रपटात हॉररसोबत दमदार विनोदाचा डोस मिळणार, हे स्पष्ट होते. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी “जुना अक्षय परत आला” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Bhoot Bangla movie 2026
'83 वर्षे वय, पण स्वॅग तोच'! कल्की 2 चे शूटिंग सुरु; महानायक अमिताभ बच्चननी शेअर केला कमल हसनसोबत खास Photo

या चित्रपटाची स्टारकास्टही तितकीच भक्कम आहे. अक्षय कुमार यांच्यासोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू, राजपाल यादव, मिथिला पालकर आणि असरानी यांसारखे कलाकार झळकणार आहेत. विविध पिढ्यांतील कलाकार एकत्र आल्याने चित्रपटाबद्दलचा उत्साह आणखी वाढला आहे. ‘भूत बंगला’ हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला जात आहे. अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

Bhoot Bangla movie 2026
Shah Rukh Khan: "शाहरुखसोबत काम करणार का?" प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिले उत्तर; म्हणाला 'तो आवडत नाही असं..'

हा बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. २०२६ मधील मोठ्या मनोरंजनपटांपैकी एक ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रेक्षकांचा प्रतिसाद काय मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com