Salman Khan
Salman Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan : सलमाननं चाहत्यांसाठी लिहिलेलं जुनं पत्र झालंय व्हायरल; सलमान म्हणतो...

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने कालच आपला 57 वा वाढदिवस साजरा केला त्यानिमित्ताने सलमानने स्वहस्ते लिहलेलं एक पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हे पत्र सलमानने 1990 साली लिहलं होतं. 'मैने प्यार किया'च्या मिळालेल्या यशानंतर सलमानने हे पत्र लिहुन चाहत्यांचे आभार मानले होते

या पत्रात सलमान चाहत्यांचे प्रेम आणि आपुलकीबद्दल चाहत्यांचे आभार मानले होते. सलमानच्या वाढदिवसानिमित्त हे पत्र त्याच्या एका चाहत्याने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. त्यानंतर हे पत्र व्हायरल झालं. या पत्रात सलमान लिहतोय, “माझ्या प्रिय चाहत्यांनो, तुम्ही माझ्याबद्दल जाणून घ्यावे असं मला वाटतं.”

सगळ्यात पहिल्यांदा मला स्वीकारल्याबद्दल आणि तुम्ही माझे फॅन्स झालात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी माझ्या समजुतीनुसार चांगल्या स्क्रिप्ट्सवर काम करतोय माझा फोकस तोच आहे. कारण माझ्या पुढच्या कामाची तुलना ' मैने प्यार किया'शी केली जाईल. त्यामुळे मी जेव्हाही एखादी घोषणा करेन तेव्हा विश्वास ठेवा की तो एक चांगला चित्रपट असेल आणि मी त्यात माझे 100 टक्के देईन.

माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मला आशा आहे की तुमचंही माझ्यावर असंच प्रेम कराल कारण ज्या दिवशी तुमचं माझ्यावरचं प्रेम संपेल, तुम्ही माझे चित्रपट पाहणार नाहीत तो माझ्या करिअरचा शेवट असेल. माझ्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, माझ्याकडे काही सांगण्यासारखे नाही, तुम्हाला सगळं माहित आहे.

पत्रात पुढे सलमान म्हणतो “लोक म्हणतात मी बरंच काही मिळवले आहे पण हे पटत नाही. मला अजून बरेच काही मिळवायचं आहे, मला फक्त एक गोष्ट माहित आहे की मला तुम्ही मला स्वीकारलं आहे

सलमानचं हे पत्र वाचुन चाहते भावनाशील झाले असतील हे मात्र नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT