Pathan's Director on Bikini Controversy : दिपीकाला का दाखवलं बिकीनीमध्ये? सांगतोय चित्रपटाचा दिग्दर्शक..

पठाण चित्रपटातल्या बेशरम गाण्यात दिपीकाने बिकीनी का घातली सांगतोय चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद
 Deepika Padukone
Deepika PadukoneDainik Gomantak

शाहरुख खान(Shah Rukh Khan) आणि दिपीका पदुकोण(Deepika Padukone) यांचा आगामी पठाण चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं वादाचं मुख्य कारण आहे.या गाण्यात दिपीकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आणि देशभर विरोध सुरु झाला.हे गाणं अश्लील असुन दिपीकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत अशी भूमीका काही हिंदुत्ववादी संघटनांंनी घेतली.

हा विरोध इतका वाढला देशभरातल्या 7 राज्यांनी या चित्रपटाला विरोध केला. बिहारमध्ये तर शाहरुख खानसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण बेशरम रंग या गाण्यात बिकीनी का घातली? या प्रश्नाचं उत्तर देतोय पठाण चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद.

 Deepika Padukone
Mrs World 2022: तब्बल 21 वर्षानंतर भारतीय सुंदरीला 'मिसेस वर्ल्ड 2022'चा किताब

सिद्धार्थ आनंद म्हणाला ''दिपीका ही केवळ इंडस्ट्रीतली एक जबरदस्त अ‍ॅक्ट्रेसच नाही तर सलग कामांतुन तिने आपली ग्रोथ केली आहे. पडद्यावर सहज वावर करण्याबरोबर अ‍ॅक्ट्रेस ग्लॅमरससुद्धा दिसतात. त्यामुळे दिपीका जेव्हा तुमच्याकडे काम करते तेव्हा तुमची ही जबाबदारी बनते की तुम्ही तिच्या इमेजच्या बाबतीत तीला न्याय द्यायला हवा.

दिपीकाला बिकीनीमध्ये दाखवण्याबद्दल सिद्धार्थ आनंद म्हणतो कि मला दिपीकाला आतापर्यंतच्या सर्वात हॉट लुकमध्ये दाखवायचं होतं. मी याबाबतीत माझ्या टीमशी बोललो आणि आमचं मिशन तयार झालं, मला आनंद आहे कि आमचं हे मिशन पुर्ण झालं".

सिद्धार्थ आनंद पुढे सांगतो, "हे गाणं स्पेनच्या समुद्रकिनाऱ्यावर शुट झालं आहे. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं होतं कि दिपीकाला या गाण्यात जेवढं हॉट दाखवता येईल तेवढं दाखवायचं" दिग्दर्शकाच्या या निर्णयावर दिपीकाही खुप खुश झाली, इतकंच नाही तिने सिद्धार्थ आनंदला कॉकटेल, हैप्पी न्यू ईयर आणि गहराईया या चित्रपटातला तिचा हॉट लुक बघण्याचा सल्ला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com