Ranbir Kapoor Viral Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Kapoor: सेलिब्रिटी असल्याचा इतका अहंकार?... रणबीर कपूरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल...

Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

Ranbir Kapoor Viral Photo: अभिनेता रणबीर कपूर इंडस्ट्रीतला एक चांगला अभिनेता म्हणून ओळखला जातो. रॉकस्टार, बर्फी यांसारख्या चित्रपटातून त्याने अभिनयाची जादू दाखवली आहे.

सध्या रणबीर त्याच्या आगामी अॅनिमल या चित्रपटामुळे चर्चेत आहेच पण सकाळपासून त्याची चर्चा एका व्हायरल व्हिडीओमुळे होत आहे. सध्या रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.

अ‍ॅनिमलमध्ये वेगळ्या भूमीकेत

अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूर पहिल्यांदा ग्रे शेड अवतारात दिसणार आहे. पण रुपेरी पडद्याआधीच रणबीरचा अँग्री यंग मॅन अवतार सोशल मीडियावर पाहायला मिळाला.

नुकताच रणबीर कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो पापाराझींवर संतापलेला दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटिझन्सनी त्याला ट्रोल केले आहे.

व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूरचा एक व्हिडिओ बुधवार संध्याकाळपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, रणबीर कपूर त्याच्या कारच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्या दरम्यान पापाराझी रणबीरला फोटोसाठी पोझ देण्यासाठी विनंती करतात.

एक कॅमेरामन त्याला हाक मारतो आणि म्हणतो 'आरके भाऊ थांबा.' पापाराझींच्या बोलण्यावर रणबीर कपूरला थोडा राग येतो आणि तो म्हणतो - काय करू भाऊ? मी काय करू? आणि मग पुढे जातो. आपल्या कारमध्ये बसून तो निघून जातो.

दिवाळीच्या शुभेच्छाही स्वीकारल्या नाहीत

रणबीर कपूरला यावेळी पाराझींनीह दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पण तो उत्तर न देता कारमध्ये बसून निघून गेला. रणबीर पापाराझींवर संतापला हे कोणालाच आवडले नाही. रणबीरचे हे वागणं त्याच्या चाहत्यांना देखील आवडले नाही.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे. या व्हिडीओवरून रणबीर कपूर ट्रोल झाला आहे. रणबीरच्या वागण्यावर एका यूजरने लिहिले - 'आरकेने वाईट वागला.' तर दुसर्‍या युजरने लिहिले की, 'आरकेचे वागणे अत्यंत असभ्य आहे.'

तिसऱ्या युजरने लिहिले की, हे अजिबात चांगले नाही' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'एवढा अहंकार चांगला नाही.'

चित्रपटात हे कलाकार

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणपबीर अ‍ॅनिमल चित्रपटामध्ये त्याचा अ‍ॅक्शन आणि ग्रे-शेड अवतार दाखवणार आहे.

रणबीरसोबत या चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत.

संदीप वांगा रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT