Ravi Kisan: आयपीएलचे सामने सुरु झाल्यापासून क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. यावेळी भोजपूरीतून क्रिकेटची कॉमेंटरी सुरु झाली असून ही जबाबदारी रवि किशनने घेतली आहे. त्याचाही एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. आता यावर येणाऱ्या प्रतिक्रियांवर रवि किशनने मत मांडले आहे.
काय म्हणाला रवि किशन ?
भोजपूरी माझी मातृभाषा आहे. भोजपूरी एक लिटरेचर आहे. मात्र एक वर्ग असा आहे जो काही गाण्यांमुळे आणि चित्रपटांमुळे भोजपूरीला हीनदृष्टीने पाहतो. भोजपूरीला एक विशिष्ट दर्जा देण्यासाठी , देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भोजपूरीची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे हेच माझे काम असणार आहे. ते प्रयत्न काही प्रमाणात सफल होताना दिसत आहे. भोजपूरी कॉमेंट्रीनंतर आयपीएलची व्हीवरशीप 20 टक्यांनी वाढल्याचे मला कोणीतरी सांगितले असे रवि किशनने म्हटले आहे.
जे लोक भोजपूरी नाहीत ते लोकदेखील भोजपूरी कॉमेंट्रीसाठी सामने पाहत आहेत असे रवि किशनने म्हटले आहे. सोशल मिडियावर यावर मोठ्या प्रमाणात मीम्स येत असून आपल्या जिल्ह्याचे नाव घेण्यासाठी लोक मला कॉल आणि मेसेज करत आहेत. क्रिकेटची कॉमेंट्री करताना भीती वाटली नाही. माझ्या डिक्शनरीमध्ये असंभव शब्द नाही असेही रवि किशनने म्हटले आहे.
दरम्यान, क्रिकेटमध्ये भोजपूरी कॉमेंट्री ही पहिल्यांदच होत आहे. याची काहीजण प्रशंसा करत आहेत तर काहीजण यावर टीका करत आहेत. काही लोक निगेटीव्ह असतात पण याकडे लक्ष देत नाही असेही रवि किशनने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.