Jagpati Babu
Jagpati BabuDainik Gomantak

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: 33 वर्षाच्या करिअरमध्ये 170 चित्रपट; हा खलनायक घेणार सलमानशी पंगा

Kisi ka bhai kisi ki jaan: 'किसी का भाई किसी का जान' चित्रपटातून त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले आहे.
Published on

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा चित्रपट किसी का भाई किसी की जान हा चित्रपट वेगेवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या जगपती बाबूंची चर्चा सुरु आहे.

साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या जगपती बाबूंनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता 'किसी का भाई किसी का जान' चित्रपटातून त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले आहे.

आपल्या 33 वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी 170 फिल्म केल्या आहेत. त्यांचे वडील वीबी राजेंद्रप्रसाद हे प्रोड्यूसर-डायरेक्टर आहेत. त्यांनी सुरुवातीला एका डेब्यू फिल्ममधून त्यांनी आपल्या कऱिअरला सुरुवात केली होती.

Jagpati Babu
Neetu Kapoor Viral Post : कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर या दोघांच्या आईमध्ये भांडण का सुरू आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, 1974 मध्ये आलेल्या Manchi Manushulu चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर आलेल्या पिटी य़ा चित्रपटात त्यांच्या आवाजामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले होते.

रामगोपाल शर्माच्या गायम चित्रपटाने त्यांच्या करिअरला य़ुटर्न दिल्याचे म्हटले जाते. Maavichiguru या चित्रपटासाठी जगपती यांनी बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता.

काही सुपरहिट चित्रपटानंतर त्यांचे कितीतरी चित्रपट फ्लॉफ झाले. २०१४ मध्ये त्यांच्या करिअरने पून्हा एकदा यूटर्न घेतल्याचे म्हटले जाते.

आता जगपती बाबू किसी का भाई किसी की जान चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. आता साऊथ इंडस्ट्रीप्रमाणेच बॉलीवूडमध्येदेखील ते आपल्या अभिनयाची जादू दाखवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com