Prithvi Shaw- Nidhi Tapadia Dainik Gomantak
मनोरंजन

Prithvi Shaw- Nidhi Video : पीचवर फॉर्म नसला म्हणुन काय झालं, पृथ्वी भाऊ प्रेमाच्या ट्रॅकवर सुसाट...गर्लफ्रेंड बघितली का?

Rahul sadolikar

आयपीएलच्या 16 व्या हंगामात, जर एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीमुळे सर्वात जास्त टीकेला सामोरे जावे लागले असेल तर तो दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) खेळाडू पृथ्वी शॉ होता. आता लीग स्टेजसह संघाचा प्रवास संपल्यानंतर, शॉ पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड निधी तापडियासोबत सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसला आहे. 26 मे रोजी अबू धाबी येथे आयोजित आयफा अवॉर्ड शोमध्ये दोघांनी हजेरी लावली होती.

पृथ्वी शॉची मैत्रीण निधी तापडिया एक मॉडेल असून तिला अभिनयात करिअर करायचे आहे. या कार्यक्रमात दोघेही काळ्या कपड्यात दिसले. या सोहळ्यासाठी पृथ्वी शॉने जॅकेट आणि शर्टसोबत काळ्या रंगाची जीन्स घातली होती. तर निधीने काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. दोघेही खूप सुंदर दिसत होते.

दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू असलेल्या पृथ्वी शॉसाठी, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट आयपीएल हंगाम आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे, शॉला संघ व्यवस्थापनाने काही सामन्यांनंतर प्लेइंग 11 मधून वगळले. 

मात्र, हंगामाच्या शेवटी शॉला काही सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याला पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतकी खेळी खेळता आली.

सर्वात खराब कामगिरी

या हंगामात 23 वर्षीय पृथ्वी शॉ 8 सामन्यात केवळ 106 धावा करू शकला. शॉचा खराब फॉर्म पाहता भारतीय संघात पुनरागमन करणे त्याच्यासाठी सोपे काम असणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत काही युवा खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. यामध्ये यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची नावे शर्यतीत आघाडीवर आहेत.

आयफा आज अबूधाबीत रंगणार

अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्सची जोरदार तयारी सुरू आहे. बॉलीवूड तारकांनी सजलेली संध्याकाळ आज अबुधाबी अनुभवणार आहे. आज संध्याकाळी प्रेक्षकांना नृत्य, गायन, संगीत आणि मनाला भावणाऱ्या परफॉर्मन्सची झलक पाहायला मिळेल. 

या वर्षी सर्व स्टार्स अवॉर्ड शोमध्ये आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क करणार आहेत यात शंका नाही. कार्यक्रमानंतर अनेक अपडेट्स समोर आले आहेत. स्टार्सच्या लूक्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी आयफाने या शोच्या तांत्रिक पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

Anti Aircraft Missile System: कोणत्या देशांकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम; भारताचं काय स्टेटस?

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT