Pawan Kalyan  Dainik Gomantak
मनोरंजन

Pawan Kalyan: पवन कल्याण विवाहित असुनही या अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा..पण दुसरे लग्नही टिकले नाही...

साऊथ सुपरस्टार पवन कल्याण विवाहित असुनही सहअभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता.

Rahul sadolikar

South Superstar Pawan Kalyan : साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण हा चित्रपटांसोबतच खऱ्या आयुष्यातही वादात सापडला आहे. पवन कल्याणचे लव्ह लाईफ खूप वादग्रस्त राहिले आहे. साऊथचा सुपरस्टार पवनने एक-दोन नव्हे तर तीनदा लग्न केले आहे.

 डेब्यू चित्रपटानंतरच पवनने नंदिनीसोबत लग्न केले. वास्तविक पवनने नंदनीसोबत अरेंज मॅरेज केले होते. पवन या लग्नावर खूश नव्हता.

 पवन कल्याण आणि नंदिनी लग्नानंतर काही महिन्यांनी वेगळे राहू लागले. यानंतर पवनच्या आयुष्यात रेणूदेवी देसाईचा प्रवेश झाला. पवन आणि रेणूची प्रेमकहाणीही खूप वादग्रस्त होती. पवन आणि रेणू 27 जानेवारी 2009 रोजी विवाहबंधनात अडकले. 

काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. आज दोघेही एकत्र असते तर त्यांचा 11वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला असता. या खास प्रसंगी जाणून घेऊया दोघांची प्रेमकहाणी...

वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी १९ वर्षीय नंदिनीसोबत अरेंज मॅरेज केले होते. पवन कल्याण त्याच्या पहिल्या लग्नात खूश नव्हता. लग्नानंतर पवन कल्याण जेव्हा रेणू देसाईला भेटला तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. 

पवन नंदिनीला घटस्फोट न देता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. रेणू देसाईवर मनापासून प्रेम करणाऱ्या पवन कल्याणने विवाहित असूनही उघडपणे त्यांचे नाते स्वीकारले.

रेणू देसाई आणि पवन कल्याण यांचे प्रेम त्या काळात इतके वाढले की दोघांनीही समाजाचे नियम धाब्यावर बसवले. लग्नापूर्वी तिने 2004 साली एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव अकिरा आहे. आधीच लग्न झालं असल्यामुळे पवन कल्याणला अभिनेत्री रेणू देसाईसोबत लग्न करता आले नाही. 

दरम्यान, त्याची पहिली पत्नी नंदिनीने त्याच्यावर दोन लग्न केल्याचा गुन्हा दाखल केला. नंतर खूप काळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर पवनने 2008 मध्ये नंदिनीला घटस्फोट दिला आणि नुकसानभरपाई म्हणून पाच कोटी रुपये दिले.

पवन कल्याणने नंदिनीपासून घटस्फोट घेतल्यानंतर 2009 मध्ये रेणू देसाईशी लग्न केले आता ते कायदेशीर पती-पत्नी बनले होते. रेणूचे कुटुंबीय या नात्यावर खूश नव्हते, पण लग्नानंतर त्यांनीही या नात्याला होकार दिला. लग्नानंतर पवन कल्याण आणि रेणू देसाई यांना आद्या या मुलीला जन्म दिला. 

पवन कल्याण यांच्या मुलीचा जन्म 2010 मध्ये झाला. मात्र, लग्नानंतर लगेचच दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. रिपोर्ट्सनुसार, पवन आर्थिक संकटात सापडलेला त्याचा भाऊ नागेंद्र याला मदत करत होता. रेणूला ही गोष्ट आवडली नाही. दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले आणि दोघे वेगळे झाले. यानंतर 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Statue Construction: ‘एमपीए’च्या जागेतील ‘तो’ पुतळा हटविण्याचे हायकोर्टाचे निर्देश; प्रशासकीय निष्क्रियतेवर ओढले ताशेरे

Arpora Nightclub Fire: हडफडे अग्नितांडवातील संशयित अधिकाऱ्यांवर सरकार मेहरबान; चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच सिद्धी हळर्णकर, शमिला मोंतेरो यांचे निलंबन मागे

Ponda By Election 2026: रणधुमाळीत जाहीर प्रचाराची सांगता, हायकोर्टाच्या निकालावर फोंडा पोटनिवडणुकीचं भवितव्‍य; भाजपसह काँग्रेस, आपची ताकद पणाला

Horoscope 8 April 2026: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार नवीन नोकरीची संधी; अडकलेले पैसेही परत मिळणार

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

SCROLL FOR NEXT