Pathan Day 3 : पठाण तिसऱ्या दिवशी सुस्त, अजुनही या चित्रपटाचा रेकॉर्ड नाही मोडू शकला..

शाहरुख खानच्या 'पठाण'ची सुरूवात जबरदस्त झाली असली तरी तिसऱ्या दिवशी पठाण सुस्त पडला आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan Dainik Gomantak

Pathan Day 3 Box Office Collection : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चित्रपटाचा विरोध आणि त्यावर झालेली एवढी मोठी चर्चा आतापर्यंत कुठल्याही चित्रपटाच्या वाट्याला आली नसेल. चित्रपटाला काही संघटनांकडुन झालेला विरोध आणि त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही सिन्सना लावलेली कात्री असा प्रवास करत पठाण रिलीज झाला, आणि तो हिटही झाला.

चित्रपटाचा वाद अजुनही सुरू असला तरी चित्रपटाने छप्परफाड कमाई केली हे मात्र खरे ;पण पहिल्या दिवशी चित्रपटाने केलेल्या कमाईचा वेग तिसऱ्या दिवशी मात्र राहिला नाही.

'पठाण'चा तिसऱ्या दिवसाचा संग्रह समोर आला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, या चित्रपटाने भारतात 34 ते 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतर चित्रपटांच्या तुलनेत हे कलेक्शन खूपच कमी आहे. सुट्टी नसल्यामुळे 'पठाण'च्या कमाईचा वेग मंदावला असल्याचे मानले जात आहे.

पठाण बॉक्स ऑफिस कलेक्शन तिसऱ्या दिवशा थंडावले आहे. शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' रिलीजच्या तिसऱ्या दिवशी थंड पडला आहे. सुट्टी न मिळाल्याने या चित्रपटाला फटका बसल्याचे दिसत आहे.या चित्रपटाने दररोज नवनवे रेकॉर्ड बनवल्याने 'पठाण' तिसऱ्या दिवशी 200 कोटींचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही.

'पठाण'चा तिसऱ्या दिवसाचा संग्रह समोर आला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, या चित्रपटाने भारतात 34 ते 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतर चित्रपटांच्या तुलनेत हे कलेक्शन खूपच कमी आहे.

तिसर्‍या दिवसाच्या कमाईने 'पठाण' नवीन रेकॉर्ड बनवेल आणि बाहुबली 2, केजीएफ 2 आणि दंगल सारख्या चित्रपटांनी तिसर्‍या दिवशी केलेले रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता निर्माण झाली होती ;पण ही शक्यता संपलेली आहे.

शुक्रवार, 27 जानेवारी हा सुट्टीचा दिवस नसल्यामुळे बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'पठाण'ची कमाई मंदावली. इतर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर 'संजू'ने तिसऱ्या दिवशी 46.71 कोटी, 'बाहुबली 2'ने 46.5 कोटी, 'KGF 2'ने 42.9 कोटी, 'टायगर जिंदा है'ने 45.53 कोटी रुपये आणि 'दंगल'ने 45.53 कोटी रुपये कमावले होते.या सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाचा तिसरा दिवस सुट्टीचा होता.

Shah Rukh Khan
Ranbir Alia Video Viral: आलिया अन् रणबीर फुटबॉलच्या मैदानात! या टीमला चीअर...

दुस-या दिवशी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 70 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरात 200 कोटींचा टप्पा पार केला. यासह, या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस आणि त्याचा पुढचा दिवस भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा दिवस ठरला आहे.

कोविड-19 नंतर 'पठाण' हा पहिला हिंदी चित्रपट आहे,ज्याने सलग दोन दिवस सर्वाधिक कमाई केली आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपटही ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com