Pathan Box Office Collection: अभिनेता शाहरुखच्या पठाणचीच चर्चा दिवसभर सुरू होती. चाहत्यांनी पठाण इतका डोक्यावर घेतला की रिलीज झाल्यानंतर थिएटरबाहेरचा जल्लोष एखाद्या उत्सवासारखा होता. हे दृश्य एखाद्या सणापेक्षा कमी नव्हते.
आता पठाण बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. पठाणने KGF: Chapter 2 आणि War चे रेकॉर्ड तोडले आहेत. चला पाहुया कशी होती पठाणची पहिल्या दिवसाची कमाई.
पठाण आला आहे... आणि तो असा आला आहे की बॉक्स ऑफिसवर घबराट निर्माण झाली आहे. पठाणचा हँगओव्हर लोकांना आता व्यक्त व्हायला लावत आहे. सगळीकडे फक्त पठाण, पठाण, पठाण अशीच चर्चा आहे.
थोडक्यात शाहरुख बाजीगर ठरला आहे. कुठे नाट्यगृहात नाचत तर कुठे फटाके फोडून पठाणच्या रिलीजचा आनंद साजरा केला. पठाणच्या धमाकेदार एंट्रीने चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा चमक आली...
अशी क्रेझ तुम्ही याआधी कुठे पाहिली आहे का? तसे, चाहत्यांना वेड लागणंच बाकी आहे असं वातावरण प्रत्येक थिएटरबाहेर आहे. अखेर किंग खानने तब्बल 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुखचा पठाण रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहाबाहेर जल्लोष झाला. हे दृश्य एखाद्या सणापेक्षा कमी नव्हते.
पठाण बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली आहे. यासह शाहरुख खानचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नॉन हॉलिडे ओपनर चित्रपट बनला आहे. पठाणने KGF: Chapter 2 चाही रेकॉर्ड मोडला आहे.
भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठे ओपनिंग कलेक्शन KGF: Chapter 2 च्या नावावर होते. KGF 2 च्या हिंदी डबने पहिल्या दिवशी 53.95 कोटी रुपये कमावले आहेत.
यशच्या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपासून सर्व हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. KGF Chapter 2 नंतर, बॉलीवूडचा सर्वात मोठा ओपनिंग कलेक्शन चित्रपट वॉर होता.
वॉरने पहिल्याच दिवशी ५३.३५ कोटींचा आकडा गाठला. पण पहिल्या दिवसाच्या कमाईत पठाणने भारतीय चित्रपटसृष्टीतील या बड्या चित्रपटांची धूळ चाटली आहे. पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई करून पठाणने आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
आतापर्यंत पहिल्या दिवशी जोरदार कमाई करणाऱ्या सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड शाहरुखच्या पठाणने मोडले आहेत. वॉर - रु 53.35 कोटी, ठग्स ऑफ हिंदोस्तान - रु 52.25 कोटी, हॅप्पी न्यू इयर - रु 44.97 कोटी 4. भारत - रु 42.30 कोटी, प्रेम रतन धन पायो-रु 40.35 कोटी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.