Money Heist Season 5 Instagram/@moneyhiest.netflix
मनोरंजन

Money Heist Season 5: आज होणार ट्रेलर रिलीज

सीझन 5 मनी हेस्टचा (Money Heist) शेवटचा सीझन (Season) असणार आहे.

दैनिक गोमन्तक

नेटफ्लिक्सवरील सर्वांत लोकप्रिय आणि ट्रेंडिग वेब सिरिज 'मनी हेस्ट' (Money Heist) च्या पाचव्या सीजनचा ट्रेलर(Trailer) आज रिलीज होणार आहे. सीझन 5 मनी हेस्टचा शेवटचा सीझन (Season) असणार आहे. यामुळे ही वेब सिरिज पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये (Audience) उत्सुकता लागली आहे. आज म्हणजे 2 ऑगस्ट रोजी या वेब सिरिजचा (Web series) ट्रेलर रिलीज (Trailer) होणार आहे. यामुळे प्रेक्षक या वेब सिरिजचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. लॉकडाउनमुळे (Lockdown) ही वेब सिरिज जगभरात पाहिली जाणारी सर्वात आवडती वेब सिरिज (Web series) ठरली आहे. चाहत्यांना (fans) या वेब सिरिजचा (Web series प्रत्येक सीजन (Season) आवडला आहे. या वेब सिरिजच्या जबरदस्त सस्पेन्सने सर्व प्रेक्षकांना वेड लावले आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने नुकतेच या वेब सिरिजशी निगडीत संबंधित एक छोटीशी क्लिप सोशल मिडियावर (Social media शेअर केली आहे. या क्लिपमध्ये आम्ही अभिनेता अल्वारो मोर्टे (Alvaro Morte) उर्फ प्रोफेसरच्या खुर्चीला बांधलेले पहिले होते. हे बघून हे स्पष्ट होते की, कोणाच्याही हाती न आलेला प्राध्यापक आता इन्स्पेक्टर अॅलिसिया सिएराच्या (Alicia Sierra) मुठीत आला आहे. सीझन चारच्या शेवटच्या भागात, पहिले होते की, एलिसिया प्राध्यापकाचा शोध घेत आहे, करण ती आता प्राध्यपकांचा बदला घेण्याच्या मन:स्थितित आहे. एलिसियाने नोकरी गमावल्यानंतर पोलिस खात्यामुळे सुरू झालेल्या या दोघांमधील लढा अगदी वैयक्तिक झाला आहे.

हा व्हिडिओ रिलीज होताच, सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. चाहत्यांना हा व्हिडिओ पाहून, थोडे आश्चर्य वाटले की प्रोफेसरला पोलिसांनी पकडले आहे, किंवा प्राध्यापकाची काही नवी युयक्ति आहे. पाचव्या सीझनमध्ये आपल्याला काय आणविण पाहायला मिळेल हे अद्याप उघड झाले नाही. यामुळेच चाहते आज या वेब सिरिजच्या पुढील ट्रेलरची वाट पाहत आहेत. आज 'मनी हेस्ट' चा ट्रेलर पाहिल्यानंतर प्राध्यापक आणि त्यांची संपूर्ण टीम चाहत्यांच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

SCROLL FOR NEXT