Manoj Muntashir Apology Dainik Gomantak
मनोरंजन

Manoj Muntashir Apology: आदिपुरूषच्या लेखकाने हात जोडून माफी मागितली म्हणाला, बजरंगबली सगळ्यांना.....

आदिपुरूषचा लेखक मनोज मुंताशीर गेल्या काही काळापासुन वादाच्या केंद्रस्थानी आहे.

Rahul sadolikar

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरूष हा चित्रपट फर्स्ट लूक रिलीज केल्यापासुन वादाच्या केंद्रस्थानी आहे. कधी चित्रपटातल्या पात्रांच्या लूकवरुन ट्रोलींग झालं तर कधी अन्य कारणाने. चित्रपट रिलीज झाल्यावर मात्र एक वाद जोरदार पेटला आणि तो म्हणजे चित्रपटांचे संवाद.

सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या संवादावर प्रचंड टीका करण्यात आली होती. आता या तापलेल्या प्रकरणावर चित्रपटाचा लेखक मनोज मुंताशीरने माफी मागितली आहे.

मनोजचं मत बदललं

प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे संवाद लिहिणारे लेखक मनोज मुंतशीर आता आपलं मतन बदलताना दिसत आहे. आतापर्यंत आपल्या बचावात वक्तव्य करणाऱ्या मनोजने आता हात जोडून माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट शेअर केले असून बंधू-भगिनी, वडीलधारी मंडळी, आदरणीय ऋषी-संत आणि श्री राम भक्तांची बिनशर्त माफी मागितली आहे. चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्याने मान्य केले. 

मनोज पुढे म्हणाला

भगवान बजरंगबली सर्वांचे कल्याण करोत असे त्यांनी लिहिले. यापूर्वी मनोजने हनुमानाबद्दल केलेल्या विधानावर बरीच टीका झाली होती. मनोज म्हणाला होता की, हनुमान भक्त होते, आम्ही त्यांना देव बनवले होते. या विधानावर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

'मी माफी मागतो'

मनोज मुंतशीर यांनी आपल्या नवीन ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आदिपुरुष' चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषीमुनी आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो.

 भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, एक आणि अटूट राहण्याची आणि आपल्या पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!'

युजर्सच्या प्रतिक्रिया

मनोज मुंतशीर यांनी माफी मागताच हे ट्विट व्हायरल झाले. त्यांच्या या ट्विटवर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, 'संवाद लिहिण्यापूर्वी विचार करायला हवा होता.' दुसऱ्याने लिहिले, 'तुम्ही संधीसाधू आहात.' तर काहींनी 'तुम्ही आमच्या माफीला पात्र नाही' असे लिहून प्रतिक्रिया दिली.

हनुमान देव नाहीत ते भक्त

याआधी मनोज मुनताशीर यांनी हनुमानजी हे देव नसून ते रामभक्त असल्याचे सांगून नवा वाद निर्माण केला होता. आम्ही त्याला देव बनवले. यानंतर ते जनतेच्या निशाण्यावर आले होते. नंतर त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना संरक्षणही मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assmbly Live: डिलिव्हरी एजन्सी वापरत असलेल्या वाहनांवर इतर राज्यांच्या नोंदणी प्लेट

नातं वाचवण्यासाठी करिश्मा-संजयची गोवा ट्रीप! करीनाचा खुलासा चर्चेत, म्हणाली, 'त्यांना समस्या होत्या'

Sara Tendulkar: 1137 कोटी… सचिनच्या लेकीचा 'मास्टरस्ट्रोक', पर्यटनाला चालना देण्यासाठी करणार काम

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

SCROLL FOR NEXT