Goa Shigmotsav: शिमगोत्सव मेळांना 300 कोटींचे अर्थसाह्य देणार! मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

Shigmotsav 300 crore financial support: स्कृती रक्षणार्थ काम महत्त्वाचे असून संस्कृती नष्ट झाली तर देश संपतो. शिगमोत्सवाच्या मेळांना ३०० कोटींचे आर्थिक सहकार्य करणार आहे.
Shigmotsav 300 crore financial support
Shigmotsav 300 crore financial supportDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: संस्कृती रक्षणार्थ काम महत्त्वाचे असून संस्कृती नष्ट झाली तर देश संपतो. शिगमोत्सवाच्या मेळांना ३०० कोटींचे आर्थिक सहकार्य करणार आहे. नगरपालिका क्षेत्रातील सर्व क्रीडा क्लबना आर्थिक मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दिली.

स्वाभिमानी काणकोणवासीयांसह ‘काणकोण व्हिजन आणि मिशन अंतर्गत काणकोणचा विकास सुरू आहे.मडगाव ते पोळे पर्यंतचा १३०० कोटी रु.खर्च करून लवकरच सुरू होणार आहे. राज्याचे माजी कृषी मंत्री म्हणून कर्मण्ये पुरस्कार प्राप्त झाला, क्रीडा मंत्री म्हणून ४० टक्के मैदानाचे काम केले, सभापती म्हणून माझे काम सर्वश्रूत आहे.

Shigmotsav 300 crore financial support
Goa Encroachments: 'रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास काय केले'? अनुपालन अहवाल सादर करा; गोवा उच्च न्यायालयाचे निर्देश

तवडकर यांनी कला व संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने महाशिवरात्री निमित्त सर्वासाठी सुप्रसिद्ध ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम मोफत काल चावडी, येथील श्री मल्लिकार्जुन खुल्या मैदानावर आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

Shigmotsav 300 crore financial support
Goa Open Arts Festival: कला, संस्कृती, संगीताचा उत्सव! गोवा ओपन आर्टस फेस्टिवल; काय असणार कार्यक्रम? वाचा..

goaयावेळी जि.पं. सदस्य अजय लोलयेंकर, नगराध्यक्ष लक्ष्मण पागी, उपनगराध्यक्ष गंधेश मडगावकर, नगरसेवक रमाकांत नाईक गांवकर, हेमंत नाईक गावकर, धीरज नाईक गांवकर, नारसिस्को फेर्नांडिस, नितू देसाई, अमिता पागी, सरपंच सविता तवडकर, सेजल गांवकर, नीलेश पागी, महेश नाईक, चंद्रकांत सुधीर, विवेक नाईक, पंच आनंदू देसाई, प्रभाकर गावकर, मनुजा नाईक गावकर, व अन्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com