संगीत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरियन गायिका ली संग युन तिच्या परफॉर्मन्सच्या आधी वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा मृत्यू घातपात असण्याचा पोलिसांचा संशय आहे. सविस्तर वृत्त चला पाहुया.
कोरियन सोप्रानो गायिका ली संग युन यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. गिमचेऑन म्युनिसिपल कॉयरच्या 33 व्या नियमित मैफिलीत सादर होण्यापूर्वी ती एका वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या तपास सुरू आहे.
ली संग युन हे कोरियन मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत. तिने सोल नॅशनल युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली आणि मास्टर्स डिग्रीसाठी न्यूयॉर्कमधील मॅनेस स्कूल ऑफ म्युझिकमध्ये गेली.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार पोलीस तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात असेही समोर आले की गुरुवारी कार्यक्रमाच्या कर्मचार्यांनी गायिका बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर रात्री 8:32 च्या सुमारास पोलिसांना बोलावले.
तिचा मृतदेह मैफिलीच्या स्थळाच्या तिसर्या मजल्यावरील लेडीज टॉयलेटमध्ये सापडला. कारमिना बुराना ग्रँड हॉल ऑफ गिमचेऑन कल्चर अँड आर्ट सेंटर येथे जिथे ती इंग्लंड आणि होनम यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सादरीकरण करणार होती.
“ली संग युनची स्टेजवर येण्याची वेळ जवळ आली होती, पण ती बॅकस्टेजला नव्हती. जेव्हा मी बाथरूममध्ये पाहिले तेव्हा मला ती जमिनीवर पडलेली दिसली,” कार्यक्रम स्थळाच्या रात्रपाळी कर्मचाऱ्याने ही माहिती दिली.
गायिकेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जेथे तिला मृत घोषित करण्यात आल. दरम्यान, अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, पोलिसांना या प्रकरणात घातपात झाल्याचा संशय नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.