Sanjay Dutt Birthday
Sanjay Dutt Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

Sanjay Dutt Birthday: 'रॉकस्टार' म्हणत मान्यताने संजय दत्तला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता संजय दत्त आज 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने खास स्थान निर्माण केले आहे. संजय दत्तने 1981 मध्ये आलेल्या रॉकी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. संजय दत्त चार दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे. अभिनयाच्या बाबतीतही तो आजच्या कलावंतांना स्पर्धा देत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त पत्नी मान्यता दत्तने सोसल मिडीयावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. मान्यताची (Maanayata Dutt) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (maanayata dutt shares special post sanjay dutt birthday happy birthday my rockstar news)

मान्यताने संजय दत्तचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो वर्कआउट करताना दिसत आहे. फोटोमध्ये त्याने डंबेल धरले आहे आणि तो बायसेप्स फ्लॉंट करताना दिसत आहे. वयाच्या 63 व्या वर्षीही संजय दत्त स्वतःला फिट ठेवतो. तो त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेतो. संजय दत्तचा फोटो शेअर करत लिहीले – 'हॅपी बर्थडे माय रॉकस्टार'. नेहमीप्रमाणेच सर्वांना प्रेरणा देत राहा. सेलेब्स आणि चाहते मान्यताच्या पोस्टवर कमेंट करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. गायक गुरू रंधावा यांनी टिप्पणी केली - सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले - हॅपी बर्थडे बाबा.

संजय दत्त नुकत्याच रिलीज झालेल्या शमशेरा या चित्रपटात (Movie) दिसला होता. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी संजय दत्तचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर संजय दत्तने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. संजय दत्त लवकरच रवीना टंडन, पार्थ समथान, अरुणा इराणी यांच्यासोबत रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT