K.L Rahul Athiya Shetty Dainik Gomantak
मनोरंजन

K.L Rahul- Athiya Shetty: फोनवर बंदी असुनही अथिया -राहुलच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ कसा आला समोर ?

Rahul sadolikar

बॉलिवू़डचा अण्णा अर्थात सुनिल शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के.एल राहुल यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. संगीत सोहळ्यात फोनवर बंदी असुनही हा व्हिडीओ कुणी केला असा प्रश्न आता सगळे विचारत आहेत.

Athiya Shetty and KL Rahul Viral Video : अभिनेत्री अथिया शेट्टी  (Athiya Shetty) आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल आज सात फेरे (Athiya Shetty and KL Rahul Wedding ) घेणार आहेत. आज दोघांचा लग्नसोहळा खंडाळ्याला पार पडणार आहे.

सुनिल शेट्टीच्या खंडाळ्यामधल्या बंगल्यावर हा सोहळा (Khandala) होणार आहे. अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty Daughter) हे रविवारी माध्यमांना या सोहळ्याबद्दल माहिती दिली.

नवीन जोडप्यासह लग्न झाल्यावर सगळे जण माध्यमाच्या समोर येतील असं, सुनील शेट्टी यांनी सांगितलं, सुनिल शेट्टी यांचा पापाराझींची विचारपूस करताना एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे . त्यापूर्वी या सोहळ्यातील कुठल्याही क्षणाचे फोटो किंवा व्हिडीओ जगासमोर येऊ नये म्हणून फोन बंदी करण्यात आली आहे. तरीदेखील रविवारी संगीत समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाच कसा हा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Athiya Shetty and KL Rahul viral Video)

मिळालेल्या माहितीनुसार, अथियाची आई माना शेट्टी (Mana Shetty) आणि अभिनेत्रीचा भाऊ अहान शेट्टी (Ahan Shetty) यांनीही या संगीत सोहळ्यात खास परफॉर्म केलं. त्याशिवाय अथियाची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरनेही नवरीसाठी खास सप्रराईज डान्स केला.  या संगीत सोहळ्यात खास आकर्षण होतं ते मिका सिंग (Mika Singh) याचं...

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा संगीत सोहळ्या मोठ्या धुमधडाक्यात झाला. या सोहळ्यासाठी रोहन श्रेष्ठ, क्रिकेटर वरुण आरोन, हृतिक भसीन आणि गिप्पी ग्रेवाल आले होते.
या संगीत सोहळ्याला सगळे शेट्टी कुटूंबिय उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT