VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Vijay Hazare Trophy: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'विजय हजारे करंडक २०२५-२६' स्पर्धेचा साखळी टप्पा थरारक रितीने पार पडला आहे.
VHT 2025-26
VHT 2025-26Dainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Hazare Trophy 2025-26: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'विजय हजारे करंडक २०२५-२६' स्पर्धेचा साखळी टप्पा थरारक रितीने पार पडला आहे. ८ जानेवारी रोजी झालेल्या निर्णायक सामन्यांनंतर आता बाद फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून, मुंबई आणि दिल्लीसह एकूण ८ बलाढ्य संघांनी उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

दिग्गज खेळाडूंची उपस्थिती

यंदाच्या बाद फेरीत अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडू मैदानात उतरणार आहेत. विशेषतः मुंबईच्या ताफ्यात श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान यांसारख्या स्फोटक फलंदाजांचा समावेश असल्याने संघाची ताकद वाढली आहे.

दुसरीकडे, कर्नाटककडून देवदत्त पडिक्कल आणि मयंक अग्रवाल, तर पंजाबकडून युवा फलंदाज अभिषेक शर्मा आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहेत. या स्टार खेळाडूंच्या उपस्थितीमुळे उपांत्यपूर्व फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे होण्याची शक्यता आहे.

VHT 2025-26
Goa Accident: 'हा माझ्या मुलाला संपवण्याचा कट'! करमळी आंदोलनातील पंचसदस्याचा भीषण अपघात; कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप

बंगळुरूमध्ये होणार 'काँटे की टक्कर'

स्पर्धेचे सर्व बाद फेरीचे सामने बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मैदानावर खेळवले जाणार आहेत. १२ जानेवारी रोजी पहिले दोन क्वार्टर फायनल सामने होतील, तर १३ जानेवारी रोजी उर्वरित दोन सामने खेळवले जातील. साखळी फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि विदर्भ या संघांनीही दिमाखात आगेकूच केली आहे.

VHT 2025-26
Goa Fish Pollution: 'त्या अहवालामुळे नागरिकात भीतीचे वातावरण'! करंझाळेतील मच्छीमार आक्रमक; स्पष्टता देण्याची केली मागणी

उपांत्यपूर्व फेरीचे संपूर्ण वेळापत्रक

बाद फेरीतील लढती खालीलप्रमाणे रंगणार आहेत:

  • कर्नाटक विरुद्ध मुंबई

  • उत्तर प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र 

  • पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश

  • दिल्ली विरुद्ध विदर्भ

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबईसमोर कर्नाटकचे कडवे आव्हान असणार आहे, तर दिल्ली आणि विदर्भ यांच्यातील सामनाही विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com