Shah Rukh Khan| mannat|
Shah Rukh Khan| mannat|Dainik Gomantak

Shah Rukh Khan: किंग खानच्या 'Mannat'ची नवी नेम प्लेट लय भारी...

शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची नेम प्लेट गौरी खानच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली.
Published on

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान (Shah Rukh Khan) त्याच्या चित्रपटामुळेच नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असतो. पण, सध्या शाहरूख एका नवीन कारणाने पुन्हा चर्चेत आला आहे. शाहरुख खानने अलीकडेच 'मन्नत' (Mannat) घरातील बदलांमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी किंग खानने घराबाहेरील 'मन्नत' नावाची नेम प्लेट बदलली आहे. या नव्या नेम प्लेटची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता त्याच्या किंमतीबाबतही माहिती समोर आली आहे, ती जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (shah rukh khan bunglow mannat new name plate price News)

शाहरुख खानने 'मन्नत' बंगल्याबाहेर जी नेम प्लेट लावली, त्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, किंग खानच्या बंगल्याच्या नेम प्लेटची किंमत 20 ते 25 लाखांच्या जवळपास आहे. मन्नतच्या नेम प्लेटची संपूर्ण डिझाईन गौरी खानच्या (Gauri Khan) देखरेखीखाली करण्यात आली आहे.

Shah Rukh Khan| mannat|
Cannes 2022 Film Festivalमध्ये दीपिका पदुकोणला ज्युरी सदस्यांचा मान

शाहरुख खानच्या 'मन्नत' घराची नेम प्लेट पहिल्यांदाच बदललेली नाही. याआधीही अनेकवेळा नेम प्लेट बदलण्यात आलेली आहे. मन्नतच्या फोटोच्या एकूण 4 नेम प्लेट्स सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. आता चाहते मन्नतच्या नवीन नेमप्लेटसह फोटो सोशल मिडियावर शेअर करत आहेत.

* शाहरुखचा नवा चित्रपट

शाहरुख खानने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) करणार आहेत. शाहरुखच्या नव्या चित्रपटाचे नाव '(Dunki)'आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com