Vaibhav Gupta Indian Idol 14 Winner Dainik Gomantak
मनोरंजन

Indian Idol 14 Winner: वैभव गुप्ताने पटकावले 'इंडियन आयडॉल 14' चे विजेतेपद

Pramod Yadav

Indian Idol 14 Winner

'इंडियन आयडॉल 14' हा सिंगिंग रिॲलिटी शो गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ लोकांचे मनोरंजन करत आहे. 14 व्या सीझनसाठीचा विजेता मिळाला असून, कानपूरच्या वैभव गुप्ताने (Kanpur Vaibhaiv Gupta Win Indian Idol 14) विजेतेपद पटकावले आहे. वैभवला बक्षीस स्वरुपात 25 लाख रुपये आणि मारुती कंपनीची ब्रेझा कार मिळाली आहे.

सुभदीप दास हा इंडियन आयडॉलचा उपविजेता ठरला आहे, त्याला 5 लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर, दुसरा उपविजेता पियुष पनवार यालाही चॅनलतर्फे ट्रॉफीसह ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

शोची तिसरी रनरअप अनन्या पाल हिला तीन लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. अनन्या पाल, अंजना, आद्य मिश्रा, पियुष पनवार, सुभदीप दास आणि वैभव गुप्ता शोच्या फायनलमध्ये पोहोचले होते.

वैभव गुप्ताने शोच्या सुरुवातीपासूनच आपल्या आवाजाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली होती. नानकरी शहरातील मंटोरा शाळेत शिकलेल्या वैभवचा सुरुवातीपासूनच संगीताकडे कल होता. शाळेतच शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.

वैभवने बारावीनंतर इंजिनीअरिंग करावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण त्यांनी संगीतातच करिअर करायचे ठरवले. आणि वैभवचं नशीब इतकं चांगलं होतं की बारावीनंतर लगेचच त्याची इंडियन आयडॉलसाठी निवड झाली आणि तो या शोचा विजेताही ठरला.

'इंडियन आयडॉल 14' मध्ये विशाल ददलानी, कुमार सानू आणि श्रेया घोषाल जज होते. तर, सोनू निगम (Sonu Nigam) ग्रँड फिनालेमध्ये खास पाहुणे म्हणून दिसले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT