Pranita Subhash Dainik Gomantak
मनोरंजन

कन्हैयालालच्या हत्येवर भडकली कन्नड अभिनेत्री; म्हणाली, 'Hindu Lives Matter'

राजस्थानमधील उदयपूर येथील टेलर कन्हैयालालच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे.

दैनिक गोमन्तक

Udaipur Tailor Case: राजस्थानमधील उदयपूर येथील टेलर कन्हैयालालच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. रस्त्यावरुन ते सोशल मीडियापर्यंत लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहेत. (Kannada Actress Pranitha Subhash Says Hindu Lives Matter After Udaipur Tailor Kanhaiya Lal Murder Case)

दरम्यान, या संतापाच्या पार्श्वभूमीवर आता कन्नड अभिनेत्री प्रणिता सुभाषने (Pranita Subhash) या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला असून 'हिंदूंनाही काही तरी महत्त्व आहे' असे म्हटले आहे.

दुसरीकडे, प्रणिताने तिच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रणिताच्या हातात एक फलक आहे, ज्यावर लिहिले आहे, 'हिंदू जीवन महत्त्वाचे आहे'. पोस्टसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कोणी ऐकत आहे का?'. त्याचवेळी प्रणिताने तिच्या एका ट्विटमध्ये लिहिले की, 'काश मी उदयपूरचा (Udaipur) व्हिडिओ पाहिला नसता. खरं तर ही दहशत आहे. मागून ऐकू येणार्‍या या किंकाळ्या आपल्याला थक्क करायला लावत आहेत.'

तसेच, उदयपूर येथील रहिवासी टेलर कन्हैयालाल यांची सोशल मीडियावर (Social media) भाजपच्या (BJP) निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केल्यामुळे हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण 28 जूनचे आहे, जेव्हा कपडे शिवण्याच्या बहाण्याने दोन नराधम कन्हैयालालच्या दुकानात आले. त्यानंतर त्यांनी कन्हैय्यालालचा शिरच्छेद करुन निर्घृण हत्या केली. कन्हैयालाल यांच्यावर बुधवारी उदयपूर येथील अशोक नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गौस मुहम्मद, मुलगा रफिक मोहम्मद आणि अब्दुल जब्बारचा मुलगा रियाझ अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT