Udaipur Murder Case: उदयपूर हत्याकांडावर UN चे मोठे वक्तव्य, बोलली ही मोठी गोष्ट

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका हिंदू व्यक्तीच्या हत्येनंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सर्व धर्मांचा आदर करण्याचे आवाहन केले.
 Kanhaiyya Lal
Kanhaiyya Lal Dainik Gomantak
Published on
Updated on

UN Reaction on Udaipur Murder Case: राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका हिंदू व्यक्तीच्या हत्येनंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी सर्व धर्मांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. भारतातील धार्मिक तणाव आणि मंगळवारच्या हत्येबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, "आम्ही सर्व धर्मांचा आदर करण्याचे आवाहन करतो. सर्व धर्म आणि विविध समुदाय जगभरात एकोप्याने आणि शांततेने जगू शकतील याची खात्री वेळोवेळ केली पाहिजे.'' (Udaipur Murder Case United Nations Antonio Guterres Reaction)

दरम्यान, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या पत्रकार मुहम्मद जुबेरच्या (Muhammad Zubair) अटकेबाबत विचारले असता दुजारिक म्हणाले, "जगभरात कोणत्याही ठिकाणी लोकांना मुक्तपणे व्यक्त होण्याची मुभा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पत्रकारांना मुक्तपणे व्यक्त होण्याची मुभा आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही छळाची धमकी न देता."

 Kanhaiyya Lal
उदयपूर हत्याकांडातील दोषींना फाशी द्या, मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केली मागणी

'अभिव्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर आमचा विश्वास आहे'

दुजारिक पुढे म्हणाले, "आम्ही अभिव्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर विश्वास ठेवतो, जे पत्रकारांना व्यक्त होण्यासाठी आवश्यक आहे. आम्ही इतर समुदाय आणि इतर धर्मांचा आदर करण्याच्या मूलभूत गरजांवर देखील विश्वास ठेवतो."

 Kanhaiyya Lal
उदयपूर हत्याकांडातील आरोपींचं 'पाकिस्तान' कनेक्शन, कराचीत घेतलं प्रशिक्षण

दुसरीकडे, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जगभरातील 193 सदस्य देशांमध्ये प्रेसचे स्वातंत्र्य लागू आहे. युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी मंगळवारी सुरक्षा परिषदेला दिलेल्या व्हिडिओ निवेदनात सांगितले की, 'रशियन सैन्याच्या कृतींचे समर्थन करणाऱ्या पत्रकारांना शिक्षा केली जाईल.'

शिवाय, नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ एका सोशल मीडिया पोस्टमुळे कन्हैयालालची हत्या झाली आहे. नुपूर या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या, ज्यांना आता निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com