Kajol Dainik Gomantak
मनोरंजन

Kajol on Make-up: तरुण अभिनेत्रींना काजोल म्हणते, मेकअप किंवा सर्जरी...

Kajol: मी याचा माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही

दैनिक गोमन्तक

Kajol: बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री म्हणून जिची ओळख आहे ती म्हणजे काजोल होय. आपल्या अभिनयाच्या जोरावर काजोलने आपली वेगळी ओळख निर्माण करत लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या हटके अंदाजाने काजोलने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

सध्या तिने ओटीटीच्या माध्यमातून नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. नुकतीच ती लस्ट स्टोरीज2 या वेबसीरीज मध्ये दिसून आली होती तर सध्या तीची आगामी वेब सीरीज द ट्रायलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान एका मुलाखतीत तरुण अभिनेत्रींना एक बहुमुल्य असा सल्ला दिला आहे.

काजोल म्हणते की, तुम्ही कधीही कोणाच्या दबावाखाली येऊन दुसऱ्यांना हवे तसे दिसण्यासाठी मेकअप किंवा सर्जरी करु नका. तुम्ही कसे दिसणार आहात हे तुम्ही ठरवले पाहिजे, त्यात तुमची मर्जी असली पाहिजे.

तुमच्या मर्जीविरुद्ध तुम्ही मेकअप अथवा सर्जरी केली नाही पाहिजे. पुढे ती म्हणते देवाने तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने बनवले आहे, आणि तुम्ही तुम्हाला हवे तसे दिसत नाही तिथे नेहमीच मेकअप असतो असे काजोलने म्हटल्यावर किंवा सर्जरी असते असे द ट्रायलचे दिग्दर्शक सुपरण वर्मांनी म्हटले आहे.

मात्र काजोलने याला नकार देत हाच संपूर्ण मुद्दा असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सुपरण वर्मांनी एखाद्याने मेकअप केला किंवा सर्जरीची निवड केली तरी ती वैयक्तिक निवड असावी आणि ती दबावाखाली करू नये,असे म्हटले आहे.

काजोलने यावर एकमत दर्शवत मला हेच म्हणायचे आहे, जे काही तुम्ही करणार आहात त्यात तुमची मर्जी असली पाहिजे, तुमची निवड असली पाहिजे. बाकीचे 25 लोक तुम्हाला सांगत आहेत म्हणून तुम्ही मेकअप अथवा सर्जरी करु नये. फक्त इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी सर्जरीचा पर्याय निवडू नका.

  • काजोलला करावा लागला होता 'या' टीकांचा सामना

काजोल आपल्या आणखी एका मुलाखतीत स्वत:चा अनुभव सांगितला आहे. ती म्हणते मला आठवते, मला ती सावळी आहे, ती लठ्ठ आहे, ती चष्मा घालते अशा प्रकारच्या टिप्पणींचा सामना करावा लागला होता. मी याचा माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही. परिणामी एका मोठ्या काळापर्यत माझा विश्वास होता की मी हुशार आहे मात्र मी सुंदर दिसत नाही आणि सुंदर दिसण्यासाठी मी काही करु शकत नाही.

सध्या काजोल लस्ट स्टोरीज 2 मध्ये दिसत असून पून्हा एकदा आपल्या अभिनयाने काजोलने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. आता तिची आगामी वेब सीरीजला द ट्रायल प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT