Jiah Khan Suicide Case Dainik Gomantak
मनोरंजन

Jiah Khan Suicide Case: सुरज पांचोलीला अटक, जियाच्या आईचा खुनाचा आरोप अन् ती धक्कादायक चिठ्ठी

Rahul sadolikar

Jiah Khan Suicide Case: 3 जून 2013 रोजी ही अभिनेत्री जिया खान मुंबईतील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. या घटनेने बॉलिवूडसह देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेता सुरज पांचोली याच्यावर ठेवण्यात आला होता.

गेल्या 10 वर्षांपासुन सुरू असलेल्या या केसचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) न्यायालय शुक्रवारी अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर या खटल्याचा निकाल २८ एप्रिलला राखून ठेवला होता.

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला गेली 10 वर्षे सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं चला जाणुन घेऊया..

सुरज पांचोलीला अटक

जिया खानने लिहलेल्या, 10 जून 2013 रोजी जप्त केलेल्या पत्राच्या आधारे मुंबई पोलिसांनी अभिनेता सुरज पांचोलीवर कलम 306 (आत्महत्येसाठी प्रवृत्त) नुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

Suraj Pancholi

जियाच्या आईचा खुनाचा आरोप

अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज, अमिताभ बच्चन स्टारर 'निशब्द' मधील तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या जियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. जियाची आई राबिया खान यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे.

Rabia Khan

राबिया खान यांची CBI चौकशीची मागणी.

जिया खानच्या आई राबिया खान या आपल्या मुलीचा खुन झाला या आरोपावर ठाम होत्या. ऑक्टोबर 2013 मध्ये राबियाने आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Rabia Khan

सुरजकडून जियाला अपमानास्पद वागणूक?

राबियाने असाही दावा केला की तिची मुलगी सूरज पांचोलीसोबत अपमानास्पद संबंधात होती. सुरज तिचा जराही आदर करत नव्हता. राबिया खान यांच्या सांगण्यानुसार सूरज आणि जिया सप्टेंबर 2012 मध्ये डेट करू लागले होते.

तपास CBI कडे

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने जुलै 2014 मध्ये महाराष्ट्र पोलिसांकडून तपास ताब्यात घेतला. या प्रकरणाचा तपास त्यानंतर CBI नेच करायला सुरुवात केली

Jia Khan, Suraj Pancholi

ती धक्कादायक चिठ्ठी

सूरज पांचोलीचा उल्लेख करत जियाने लिहिलेल्या सहा पानांच्या पत्राच्या आधारे आरोप लावण्यात आले होते. हे पत्र तिच्या जुहूच्या सापडली होते. सीबीआयने दावा केला आहे की या चिठ्ठीत सूरजच्या हातून "जिव्हाळ्याचे संबंध, शारीरिक शोषण आणि मानसिक आणि शारीरिक छळ" झाल्याचे लिहिले आहे, ज्यामुळेच तिने आत्महत्या केली.

सत्र न्यायालयाने 2021 मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाकडे हे प्रकरण पुन्हा सोपवण्यात आले कारण सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता.

jia Khan

राबिया खान यांचा CBI वर आरोप पुढचा तपास

राबिया यांचा आरोप आहे की पोलिसांनी आणि सीबीआयने तिच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सिद्ध करण्यासाठी कायदेशीर पुरावे गोळा केले नाहीत.

सुरजचा तपास यंत्रणांवर आरोप

सूरजने न्यायालयासमोर दाखल केलेल्या त्याच्या अंतिम जबाबात, तपास आणि आरोपपत्र खोटे असल्याचा दावा केला होता आणि फिर्यादी राबिया, पोलीस आणि सीबीआय यांच्या सांगण्यावरून फिर्यादी साक्षीदारांनी त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती.

फिर्यादी पक्षाने जियाच्या आईसह 22 साक्षीदार तपासले. सूरजची बाजू मांडणारे अधिवक्ता प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला की खटला संशयापलीकडे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

Goa BJP: 'पक्ष व सरकार यांच्यात समन्वय पाहिजेच'; गोवा भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची तंबी

रस्त्यांचा सुमार दर्जाच कारणीभूत! अधिकाऱ्यांबरोबर कंत्राटदारही जबाबदार; आमदार लोबो

खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

SCROLL FOR NEXT