दिग्दर्शक मणीरत्नम यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट पोन्नियन सेल्वन 2 प्रेक्षकांच्या भेटीला 28 एप्रिलाला म्हणजे उद्याच येत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना काही प्रश्न पाडुन गेला आहे आणि त्याचीच उत्सुकता घेऊन प्रेक्षक आता चित्रपटगृहात जायला तयार आहेत.
पोन्नियन सेल्वनच्या पात्रांची निवड आणि अभ्यास करताना दिग्दर्शक मणीरत्नम यांनी आपला अनुभव पनाला लावल्याचे लक्षात येतं. या चित्रपटात त्रिशा कृष्णन महत्त्वाच्या भूमीकेत दिसणार आहे.
त्रिशा कृष्णन पोन्नियिन सेल्वन 2 मध्ये 'कुंदावई' हे पात्र साकारणार आहे. तिने पहिल्या भागात चोल साम्राज्याची राजकुमारी इलाया पिरत्तीयारच्या भूमिकेसाठी खूप प्रशंसा मिळवली होती. तिच्या या पात्राचा प्रेक्षकांवर खूपच प्रभाव पडला होता.
या पात्रासाठी त्रिशाला दिग्दर्शक मणीरत्नम यांनी एका महिला राजकारणी व्यक्तीचं निरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या गोष्टींचा मिलाप असेलेले हे पात्र साकारण्यासाठी मणीरत्नम यांनी त्रिशाला तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांचं निरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता.
मणिरत्नम यांनी दोन भागांच्या मॅग्नम ओपसचे दिग्दर्शन केले आहे, ज्याचा दुसरा भाग 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तृषा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे जी चोल साम्राज्याचे भवितव्य ठरवण्यात तिच्या कुंडवईच्या पात्राची प्रमुख भूमिका कशी होती हे दाखवते.
दिग्दर्शक मणिरत्नम यांनी त्रिशाला सूचना देताना काय सांगितलं होतं ते आता तिने एका मुलाखतीत सांगितले, "मणिरत्नम म्हणाले, 'जयललिता यांचा विचार करा'. कारण आम्ही सर्व चेन्नईचे आहोत, आम्ही अक्षरशः त्यांना पाहत मोठे झालो आहोत, त्यांना पाहत आहोत.
त्या सीएम म्हणून कशा होत्या. मणीरत्नम यांनी त्रिशाला सांगितले, 'त्रिशा बनणे थांबव, जयललिता यांचा विचार कर. त्या कशा चालतात, कशा बोलतात, त्या नेहमीच थोड्या सावध असतात. त्या भावनांना वर येऊ देत नाही. कुंडवई अशी असायला हवी.
यावर त्रिशा म्हणाली म्हणून जयललिता यांच्याबद्दल विचार करायला सुरुवात केली कारण मी त्यांचे बरेच काही, तिचे व्हिडिओ, त्यांचे चित्रपट, त्यांची बोलण्याची पद्धत पाहिली आहे, आणि मणीरत्नम यांना ते हवे होते आणि प्रत्यक्षात त्याचा फायदा झाला.
त्रिशा सध्या तिच्या इतर सहकलाकार ऐश्वर्या राय, विक्रम, कार्ती, जयम रवी, शोभिता धुलिपाला आणि ऐश्वर्या लक्ष्मी संगीत दिग्दर्शक ए आर रहमान दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासह पोन्नियिन सेल्वन 2 चे प्रमोशन करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.