Vinod Khanna Death Anniversary: 70 च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीला विनोद खन्ना यांच्या रूपाने एक उंच, प्रतिभावान आणि देखणा हिरो मिळाला. आपल्या अभिनय आणि व्यक्तिमत्वाने त्यांनी फॅन्सवर चांगलाच प्रभाव पाडला होता.
विनोद खन्ना हे त्यांच्या काळातील असे अभिनेते होते, जे केवळ त्यांच्या चांगल्या लूकसाठीच ओळखले जात नव्हते, तर मोठ्या स्टार्सना त्यांच्यासमोर करिअरच्या बाबतीत असुरक्षित वाटायचं.
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटातून काम केले आहे, ज्यात त्यांच्या अभिनय कौशल्याची वाहवा झाली आहे.
'कुर्बानी'पासून 'अमर अकबर अँथनी'पर्यंत त्यांनी 70-80 च्या दशकात असे अनेक चित्रपट दिले, ज्यांची कथा आजही लोकांच्या लक्षात आहे आणि त्यांचे पात्रही लोकांनी लक्षात ठेवले आहे. विनोद खन्ना यांचे 27 एप्रिल 2017 रोजी कर्करोगाने निधन झाले.
आजचा हा दिग्गज अभिनेता आज या जगात नाही, पण आठवणींची पेटी उघडली तर त्यांच्या चित्रपटांचा रोमांचक प्रवास पाहायला मिळेल, जिथे त्यांनी आपल्या अभिनयाने अमिताभ बच्चन यांना टक्कर दिली.
विनोद खन्ना यांनी चित्रपटाच्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत पहिले पाऊल टाकले. चित्रपट होता 'मन का मीत'. प्रत्येक नवीन कलाकाराचे स्वप्न असते ती लोकप्रियता त्यांनी पहिल्याच चित्रपटापासून मिळवली.
यानंतर त्यांच्या वाट्याला असे चित्रपटही आले, ज्यात त्यांनी सहाय्यक अभिनेता आणि मुख्य अभिनेत्याच्या दोन्ही भूमिका केल्या आणि या पात्रांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
विनोद खन्ना यांनी फिल्मी दुनियेत अशा वेळी प्रवेश केला जेव्हा अमिताभ बच्चन यांची कारकीर्दही वाढत होती.
दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विशेष म्हणजे त्या काळात विनोद खन्ना हे अमिताभ बच्चन यांच्याइतकेच फेमस होते.
रेश्मा आणि शेरा हा असा चित्रपट होता ज्यामध्ये विनोद खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा स्क्रीन स्पेस शेअर केली होती.
हा 1971 चा क्राईम ड्रामा चित्रपट आहे, ज्यात राखी, वहिदा रहमान आणि अमरीश पुरी सारख्या दिग्गज कलाकारांनी देखील काम केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.