Javed Akhtar Dainik Gomantak
मनोरंजन

तालिबान्यांशी हातमिळवणी करणाऱ्या देशांवर टीका करताना जावेद अख्तर म्हणाले....

त्याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे (Taliban) सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक बदल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) त्यांच्या विधानासाठी सतत चर्चेत असतात. मग ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social media platform) असो किंवा खाजगी कार्यक्रम असो ... ते समाजात घडणाऱ्या घटनांवर निर्भीडपणे आपले मत नोंदवत असतात. त्याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांचे (Taliban) सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक बदल करण्यात आले आहेत. जसे की, तालिबान संस्कृती विभागाने सांगितले की, आता अफगाण महिलांना कोणत्याही क्रिडा प्रकारात सहभागी होऊ दिले जाणार नाही. त्याचबरोबर तालिबानच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. गीतकार जावेद अख्तर यावरच आपले निर्भिड मत नोंदवले.

जावेद अख्तर यांनी जगभरातील नेते आणि विविध देशांच्या शांत असण्यावर ट्विट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "लाजिरवाणी गोष्ट आहे की कथितपणे सुसंस्कृत आणि लोकशाही देश तालिबानशी हातमिळवणी करण्यास तयार आहेत." त्यांनी सर्व देशांना तालिबानला मान्यता देऊ नये अशी विनंती केली आहे. “प्रत्येक उदारमतवादी व्यक्तीने, प्रत्येक लोकशाही देशाने, प्रत्येक सुसंस्कृत समाजाने तालिबान्यांकडून महिलांवर होणारे अत्याचारासंबंधी आपला आवाज बुलंद केला पाहिजे. तसेच त्याचा निषेध केला पाहिजे किंवा न्याय, मानवता आणि विवेक यासारखे शब्द विसरले पाहिजेत.

यासोबतच, आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी तालिबानच्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावरही टीका केली आहे. "तालिबानच्या प्रवक्त्याने जगाला सांगितले की महिला घरी राहण्यासाठी आणि मुलांना जन्म देण्यासाठी आहेत, मंत्री होण्यासाठी नाही, परंतु एक सुसंस्कृत समाज तालिबानशी हातमिळवणी करण्यास तयार आहे." हे लाजिरवाणे आहे.'

तालिबानच्या प्रवक्त्याने असेही सांगितले की महिलांना मंत्री बनवणे म्हणजे त्यांच्या गळ्यात फास घालणे जे ते हाताळू शकत नाहीत. त्याचबरोबर महिलांच्या कामगिरीवर हाश्मी म्हणाले की या काही महिला आहेत आणि त्या अफगाणिस्तानच्या सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

याआधी, दुसऱ्या वाहिनीशी संभाषणादरम्यान, जावेद अख्तर म्हणाले होते की, संपूर्ण जगातील उजव्या विचारांचे लोक समान आहेत. ज्याप्रमाणे तालिबानला इस्लामिक राष्ट्र हवे आहे, त्याचप्रमाणे लोकांना हिंदू राष्ट्र हवे आहे. प्रत्येकाची मानसिकता सारखीच असते.

ते म्हणाले होते, 'अर्थातच तालिबान रानटी असून त्यांची कृतीही निंदनीय आहे. जे आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाला पाठिंबा देत आहेत, तेही तेच लोक आहेत.' जावेद अख्तर यांच्यावर या वक्तव्यानंतर मोठ्याप्रमाणात टीका झाली. तथापि, ते आपले मत सोशल मिडियाद्वारे निर्भिडपणे व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी पुन्हा एकदा तालिबानबद्दल आपले मत ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT