Virat Kohali Dainik Gomantak
मनोरंजन

Virat Kohali : खलिस्तान समर्थनाची पोस्ट शेअर करताच किंग कोहलीने त्या पंजाबी गायकाला केले अनफॉलो...

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने एका पंजाबी गायकाला अनफॉलो केलं आहे. एका वादग्रस्त पोस्टनंतर विराट कोहली नाराज झाल्याचं दिसतंय

Rahul sadolikar

Virat Kohli Unfollow Punjabi Singer Subh : भारताचा स्टार क्रिकेटर, धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे. इतरवेळी आपल्या तुफानी फलंदाजीने धावांचा डोंगर बनवल्यामुळे चर्चेत असणारा किंग कोहली आता मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

विराटने कॅनडा स्थित एका पंजाबी गायकाला अनफॉलो केल्याने सोशल मिडीयावर अनेक तर्क- वितर्क लढवले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एका वादग्रस्त पोस्टनंतर विराटने गायकाला सोशल मिडीयावर अनफॉलो केल्याचं बोललं जात आहे.

गायक शुभची पोस्ट

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 23 जून रोजी सरे, व्हँकुव्हर येथील गुरुद्वारात हरदीप सिंग निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला तेव्हा पंजाबमध्ये जन्मलेल्या सुभ हा गायक वादग्रस्त ठरला होता .

पंजाबी गायक शुभने इंस्टाग्रामवर(singer subh on Instagram ) पंजाब, जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येशिवाय भारताचा नकाशा दर्शविणारी एक पोस्ट शेअर केली आणि "पंजाबसाठी प्रार्थना करा" असे कॅप्शन दिले.

विराटसोबत पांड्या, केएल राहुलनेही अनफॉलो केलं

या पोस्टने विराट कोहलीसह त्याच्या अनेक भारतीय चाहत्यांना धक्का बसला, ज्याने एकदा इंस्टाग्रामवर सुभने पोस्ट केलेल्या गाण्याला प्रतिसाद दिला होता, विराटने एकदा सुभच्या गाण्यावर कमेंटही केली होती. "आत्ता @shubhworldwide माझा आवडता कलाकार आणि फेवरेट डान्सर या गाण्यावर जे करतो ते प्रेम आहे. खरोखर मंत्रमुग्ध. ”

भारतीय दिग्गज क्रिकेटपटू असणाऱ्या विराटने शुभला अनफॉलो केल्यामुळे, KL राहुल आणि हार्दिक पंड्या सारख्या इतर क्रिकेटपटूंनीही 26 वर्षीय सुभला अनफॉलो केले. शुभचे इंस्टाग्रामवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि 13 मिलियन्स मंथली स्पॉटिफाय लिसनर्स आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाचा विरोध

बीजेवायएमने म्हणजेच भारतीय जनता युवा मोर्चाने शुभचा इंडिया कॉन्सर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे कारण त्यांनी गायकावर खलिस्तान्यांचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे.

बीजेवायएमचे अध्यक्ष म्हणाले

बीजेवायएमचे अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना म्हणाले, “भारताच्या अखंडतेचे आणि एकात्मतेचे शत्रू असलेल्या खलिस्तानवाद्यांसाठी येथे जागा नाही. 

कॅनेडियन गायक शुभला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमी, मुंबईत कार्यक्रम करू देणार नाही. योग्य कारवाई न झाल्यास आयोजकांना आमचा विरोध सहन करावा लागेल. 

boAt ने प्रायोजकत्व मागे घेते

भारतीय कंपनी boAt ने या आरोपानंतर गायकाचे टूर प्रायोजकत्व मागे घेतले आणि कंपनीने एक निवेदन जारी केले आणि सांगितले की, “या वर्षाच्या सुरुवातीला कलाकार शुभने केलेल्या टीकेची आम्हाला जाणीव झाली तेव्हा आम्ही या दौर्‍यामधून आमचे प्रायोजकत्व मागे घेण्याचे निवडले. आम्ही भारतात एक दोलायमान संगीत संस्कृती जोपासत राहू.

अग्रलेख: हॉटेल, रेल्वे, रस्ते... सर्वत्र ट्रॅकिंग! गोव्यात 'चोरांचा माग' काढण्यासाठी 'रियल-टाईम' प्रणाली आवश्यक

125 वर्षांची कोकणी कला लंडनमध्ये! वर्षा उसगावकर यांनी सादर केलं 'तियात्र'; Video Viral

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

Goa Beach Wedding: परवानगी नसताना घातला मांडव, बीच वेडिंगच्या नादात 1 लाखांचा दंड, गोव्यात घडला अजब प्रकार; वाचा

'अवामी लीग'ला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र! हसीनांच्या मृत्युदंडामागे राजकीय सूड? - संपादकीय

SCROLL FOR NEXT