Huma Qureshi Dainik Gomantak
मनोरंजन

Huma Qureshi : 5 किलो जास्त वजन... जेव्हा हुमा कुरेशीला वजनावरुन ट्रोल केलं गेलं होतं...

अभिनेत्री हुमा कुरेशीला वजनावरुन सोशल मिडीयावर ट्रोल केलं गेलं होतं.

Rahul sadolikar

हुमा कुरेशीने प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉडी शेमिंगला बळी पडावे लागले होते. मासिकाच्या मुखपृष्ठावर अशा गोष्टी कशा लिहिल्या गेल्या हे अभिनेत्रीने सांगितले. यासोबतच काही रिव्ह्यूजने तिच्या बॉडीवरही कमेंट केल्या आहेत.

हुमा म्हणते...

हुमा कुरेशीने त्या लेखांचा उल्लेख केला ज्यामध्ये तिच्या शरीराबद्दल वाईट गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या. हुमाच्या म्हणण्यानुसार, त्या लेखांमध्ये तिच्या गुडघ्यांवर भाष्य करण्यात आले होते. एवढेच नाही तर लोक त्याच्या ड्रेसवरही म्हणायचे की तिने काय घातले आहे. तसेच फोटो झूम करून शरीराच्या काही भागावरही कमेंट करण्यात आली.

5 किलो जास्त वजन

शिवाय, हुमाने उघड केले की लोकांनी तिला वारंवार वजन कमी करण्यास किंवा लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. इतकेच नाही तर एका चित्रपट समीक्षकाने एकदा सांगितले होते की हुमा सुंदर चेहऱ्याची खूप चांगली अभिनेत्री आहे, परंतु मुख्य प्रवाहातील अभिनेत्री होण्यासाठी तिचे वजन 5 किलो जास्त असावे. हा रिव्ह्यू वाचून हुमा खूप दुःखी झाली आणि रडली.

गँग्ज ऑफ वासेपूरची आठवण

हुमा कुरेशीने सांगितले की, 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये तिला फक्त 75 हजार रुपये देण्यात आले होते. याशिवाय त्याला विशेष असं काही मिळाले नाहीत.

हुमा कुरेशी म्हणाली की, तिचा पहिला चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपूर' हिट झाला होता. मात्र त्यानंतर तिला हरवल्यासारखे वाटू लागले. तिला स्वतःला असुरक्षित वाटत होतं. कारण त्या चित्रपटाची लीड एक्ट्रेस असूनही तिला ना 5 स्टार हॉटेल मिळाले ना कुठली व्हॅनिटी व्हॅन.

जास्त मोबदल्याची अपेक्षा

हुमा कुरेशीने सांगितले की, ती डेब्यू चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याचा फोटोही होर्डिंगवर छापण्यात आला होता. अशा स्थितीत त्यांना अधिक मोबदला मिळायला नको होता का, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत होता.

हुमा कुरेशीनेही 'डबल एक्सल' चित्रपटादरम्यान मुलाखती दिल्या आणि वाढलेल्या वजनामुळे तिला अनेकदा नाकारण्यात आल्याचे सांगितले. हुमा कुरेशीचे वय ३६ वर्षे आहे. सध्या हुमा तिच्या 'तरला' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Bus Stand: 'हेच का ते खड्डेमय झालेले पंचतारांकित बसस्थानक'? गोवा काँग्रेसचा सवाल; रस्त्यावर ठिय्या मारून नोंदवला निषेध

Shubman Gill: टी-शर्ट आणि ऑटोग्राफ असणारी कॅप! गावस्करांनी 'ओव्हल'मध्ये शुभमन गिलला दिले खास गिफ्ट VIDEO

Accident News: भीषण अपघात! देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 11 जणांचा मृत्यू VIDEO

भू-विनाश, वंशपरंपरागत घरांवर बुलडोझर, पण बेछूटपणे फैलावणाऱ्या झोपडपट्ट्यांची होतेय पाठराखण

RJ Mahavash युझीची गर्लफ्रेंड? घटस्फोटानंतर नवीन नात्याबद्दल स्पष्टच सांगितलं,''पुन्हा प्रेमात पडण्याची भीती...''

SCROLL FOR NEXT