Shahrukh Khan's Jawan's Legal Trouble : शाहरुखच्या आगामी 'जवान'चा फोटो - व्हिडीओ लीक, ट्विट्टरला कोर्टाचे हे आदेश...

शाहरुख खानच्या आगामी जवान या चित्रपटाचा फोटो- व्हिडीओ एका युजरने लीक केला आहे.
Shahrukh Khan's Jawan's Legal Trouble
Shahrukh Khan's Jawan's Legal TroubleDainik Gomantak

Shahrukh Khan's Jawan's Legal Trouble: गेल्या काही दिवसांपासुन शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्याही हा चित्रपट चर्चेत आहे पण वेगळ्या कारणाने. शाहरुख खान आणि अॅटली यांचा 'जवान' रिलीजपूर्वीच कोर्टात पोहोचला आहे. हे प्रकरण चित्रपटाची माहिती, फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन लीक करण्याशी संबंधित आहे. 

चित्रपटाशी संबंधित माहिती लीक केल्याप्रकरणी निर्मात्यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. आता दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी ट्विटरला आपल्या प्लॅटफॉर्मवर सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या क्लिप शेअर करणाऱ्या युजर्सची माहिती देण्यास सांगितले.

न्यायालयाने मागवली माहिती

न्यायालयाने अशा लोकांचे ई-मेल, 'आयपी अॅड्रेस' आणि फोन नंबरची माहिती मागवली आहे. याआधी, चित्रपटाच्या निर्मात्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड' द्वारे खटला दाखल केल्यानंतर न्यायालयाने YouTube, Twitter आणि Reddit यांना चित्रपटाशी संबंधित इतर सामग्री आणि क्लिप त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

चित्रपटाशी संबंधित माहिती शेअर

शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट्सच्या वतीने वकिलाने दावा केला की, ट्विटरवर अशी पाच अकाऊंट आहेत जी चित्रपटाशी संबंधित सर्व माहिती सतत शेअर करत आहेत. ते म्हणाले की जे ते 'लीक' करत आहेत त्यांना कंपनीच्या 'सिस्टीम'मध्ये प्रवेश आहे. शाहरुखच्या वकिलाने त्यांना त्या खात्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन केले.

न्यायालयाचे आदेश

न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी ट्विटरने फिर्यादीच्या वकिलांना अकाऊंटचा तपशील देण्याचा आदेश दिला आहे जेणेकरून फिर्यादी योग्य कारवाई करू शकेल. न्यायालयाने एप्रिलमध्ये विविध वेबसाइट्स आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांना 'जवान' चित्रपटाशी संबंधित कोणतेही फोटो, गाणी, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप योग्य परवान्याशिवाय प्रदर्शित करण्यास किंवा वापरण्यास प्रतिबंध केला होता.

Shahrukh Khan's Jawan's Legal Trouble
Press Freedom Day : या कलाकारांनी केलेली पत्रकाराची भूमीका आजही चाहते विसरले नाहीत

दिल्ली उच्च न्यायालयाचे ट्विट्टर,युट्यूबला आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने YouTube, Twitter आणि Reddit यांना चित्रपट निर्मात्या कंपनीने संदर्भित सर्व सामग्री आणि क्लिप तात्काळ थांबवा आणि काढून टाकण्याचे निर्देश दिले. विविध वेबसाइट्स आणि इंटरनेट वापरकर्ते आणि इतरांना जवान चित्रपटाशी संबंधित सामग्री वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या चित्रपटाच्या निर्मात्या कंपनीने केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा अंतरिम आदेश आला.

शाहरुखचा शेवटचा रिलीज पठाणही कित्येक काळ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. बेशरम रंग या गाण्याचा वाद इथपर्यंत गेला होता की, शाहरुखसह, दीपिकावर बिहारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. शेवटी सेन्सॉर बोर्डाने काही सीन्स कट करुन चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com