Hrithik Roshan grandmother Padma Rani Omprakash passes away Dainik Gomantak
मनोरंजन

Hrithik Roshan: हृतिक रोशनच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीची एक्झीट

Hrithik Roshan: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आजी पद्मा राणी यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमध्ये एकामागून एक दु:खद बातम्या ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच गायक केके ह्रदयविकाराने यांचे निधन झाले. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती. आता हृतिक रोशनच्या घरातून एक वाईट बातमी समोर आली आहे. हृतिकने त्याची लाडकी आजी गमावली आहे. हृतिक आजीच्या खूप जवळ होता. या बातमीला हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी दुजोरा दिला आहे.

अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) आजी पद्मा राणी ओमप्रकाश यांचे 16 जून रोजी मुंबईत निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्या अनेक दिवसांपासुन आजारी होत्या. गुरुवारी सायंकाळपासूनच त्यांच्या मृत्यूशी निगडीत बातम्या येत होत्या. त्यांचे जावई आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याची पुष्टी केली. ते म्हणाला, 'दुर्दैवाने बातमी खरी आहे. ओम शांती.'


मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण वयोमानाशी संबंधित आरोग्य समस्या होत्या. पद्मा या चित्रपट निर्माते जे ओम प्रकाश यांच्या पत्नी होत्या. जे हृतिकची आई पिंकी रोशनचे वडील होते. पद्मा गेल्या दोन वर्षांपासून रोशन कुटुंबासोबत राहत होत्या. त्या वयाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. पिंकी यांनी वेळोवेळी आईसोबतचे फोटो (Photo) सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

जे ओमप्रकाश यांनी 1974 मध्ये राजेश खन्ना यांच्या 'आप की कसम' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जितेंद्रसोबत 'अपना बना लो (1984), 'अपनापन (1977) , 'आशा (1980), 'अर्पण (1983)' आणि 'आदमी खिलोना है' मध्ये काम करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी 'आई मिलन की बेला (1964), 'आस का पंछी (1961), 'आये दिन बहार के (1966)', 'आंखे आंखे में' आणि 'आया सावन झूम के (1969) सारख्या बॉक्स ऑफिस हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे 7 ऑगस्ट 2019 रोजी 93 वर्षां निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT