'जर काश्मिरी पंडितांचे निर्गमन हा धार्मिक संघर्ष असेल तर...' साई पल्लवीचं मोठ वक्तव्य

साई पल्लवीने असे काही वक्तव्य केले ज्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे.
Sai Pallavi
Sai PallaviDainik Gomantak
Published on
Updated on

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) तिच्या हटके शैलीसाठी ओळखली जाते. अलीकडेच, तिच्या आगामी विराट पर्वम या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, साई पल्लवीने असे काही वक्तव्य केले ज्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. (Sai Pallavi Statement)

खरं तर, सई पल्लवीने बॉलीवूड चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये (The Kashmir Files) दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची तुलना मॉब लिंचिंगशी करून वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर वातावरण तापले आहे.

Sai Pallavi
Manushi Chhillar: सुट्टयांचा आंनद घेत मानुषी छिल्लरने शेअर केले सुंदर फोटो

साई पल्लवीचे वादग्रस्त शब्द

साई पल्लवी अनेकदा तिच्या मनमोकळ्या विचारांमुळे चर्चेत असते, पण यावेळी साई पल्लवीने जे काही वक्तव्य केले ते एका नवीन वादाला जन्म देणारं आहे. अलीकडेच एका मीडिया मुलाखतीदरम्यान साई पल्लवीने सांगितले की, "'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात काश्मिरी पंडितांचे हत्याकांड दाखवण्यात आले आहे. दुसरीकडे, हिंसाचार आणि धर्म या तराजूत तोलला गेला, तर काही काळापूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून जय श्री राम म्हणण्यास सांगितले होते. आता या दोन घटनांमध्ये काय फरक आहे ते सांगा."

Sai Pallavi
प्रियंका चोप्राने आईच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेला खास फोटो पाहिलात का ?

सोशल मीडियावर गोंधळ

साई पल्लवीच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान एका ट्विटर युजरने ट्विट करून लिहिले की, 'तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचे आहे'. दुसरीकडे, आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय स्टार्स कधीही सत्य बोलण्यास लाजत नाहीत'. अशाच काही अनेक संमिश्र प्रतिक्रिया सई पल्लवीच्या वक्तव्यावर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com