Hrithik-Saba Dainik Gomantak
मनोरंजन

Hrithik-Saba: हृतिक आणि सबा पुन्हा झाले स्पॉट, video viral

आसाममधून परतल्यानंतर हृतिक रोशन सबा आझादसोबत वेळ घालवताना दिसला.

दैनिक गोमन्तक

हृतिक रोशन नुकताच त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल पूर्ण करून मुंबईत परतला आहे. तो दीपिका पदुकोण आणि अनिल कपूरसोबत आसाममध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. शहरात परतल्यानंतर अभिनेता त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत वेळ घालवताना दिसला.

(Hrithik and Saba spotted again video viral)

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची डेट

व्हायरल व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद दोघे हातात हात घालून कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि एकत्र फिरताना दिसले. दोघांनी डेटसाठी कॅज्युअल आउटफिट निवडले. हृतिकने पांढऱ्या पँटसह स्वेटशर्ट घातला होता, तर सबाने जॉगर्ससह निळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता.

हृतिक रोशन आणि सबा आझाद एकत्र राहत नाहीत

अलीकडेच असे वृत्त आले होते की हे दोघे त्यांच्या नात्याला पुढील स्तरावर नेण्यासाठी सज्ज आहेत. तर एका सूत्राने सांगितले की, “हृतिक आणि सबा एकत्र येण्याचा विचार करत नाहीत. दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. सबा 'रॉकेट बॉईज 2' आणि 'फ्रंट पेज'मध्ये काम करत आहे, तर हृतिक आसाममध्ये 'फायटर'साठी शूटिंग करत आहे.

असेही हृतिकने केले स्पष्ट

नंतर हृतिकनेही ट्विटरवर या अफवांचे खंडन करत लिहिले की, 'यात काहीही तथ्य नाही.

हृतिक रोशन वर्कफ्रंट

'फायटर'मध्ये दीपिका पदुकोणसोबत हृतिक रोशन दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. दुसरीकडे सबाकडे 'रॉकेट बॉयज 2'मध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT