हरभजन सिंग Dainik Gomantak
मनोरंजन

हरभजन सिंग आणि गीता बसराने दुसऱ्यांदा दिली गुड न्युज

हरभजनची पत्नी गीता दुसऱ्यांदा आई झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि त्याची पत्नी गीता बसरा (Geeta basra) यांच्या घरी एक नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. हरभजनची पत्नी गीता दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. या दोघांना आधीची एक मुलगी आहे. हरभजनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. हरभजनने इंस्टाग्रामवर एक मेसेज लिहून म्हटले आहे की त्याची पत्नी आणि मुलगा दोघांचीही प्रकृती ठिक आहे. (Harbhajan Singh and Geeta Basra second time make parents)

हरभजनने लिहिले की, "आम्ही देवाचे आभार मानतो की, त्याने आम्हाला एक सुंदर मुलगा दिला आहे. गीता आणि मूल दोघेही ठीक आहेत. आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत आणि आम्ही आमच्या शुभचिंतकांचे त्यांच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.” 29 ऑक्टोबर 2015 रोजी गीता आणि हरभजनचे लग्न झाले होते. 2016 मध्ये गीताने एका मुलीला जन्म दिला. या दोघांनीही आपल्या मुलीचे नाव हिनाया ठेवले.

सोशल मीडियावरून अभिनंदनाचा वर्षाव

जेव्हापासून हरभजन सिंग यांची पोस्ट सोशल मिडियावर शेअर झाली आहे तेव्हापासून त्यांचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. श्रीलंका दौर्‍यावर सध्या संघाचे नेतृत्व करणारे शिखर धवनने "पाजी खूप मुबारकां." असे लिहित त्याचे अभिनंदन केले.

भारतीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंगचे नाव

भारतीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंगचे नाव खूप मोठे आहे. देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. तो अजूनही क्रिकेटमध्ये असून आयपीएलमध्ये खेळतो. तो आयपीएलच्या 14 व्या सत्रातील दुसर्‍या टप्प्यात दोन वेळा विजयी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे.

गीताची चित्रपट कारकीर्द

गीताने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2006 मध्ये ती पहिल्यांदा इमरान हाश्मीसोबत दिल दे दीयामध्ये दिसली होती. इमरानबरोबर ती 2007 मध्ये ‘द ट्रेन’ या चित्रपटात दिसली होती. 2013 मध्ये आलेला जिला गाझियाबादमध्येही ती दिसली. याशिवाय तीने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT