Birthday Special: Alok Nath
Birthday Special: Alok NathDainik Gomantak

Birthday Special: संस्कारी बाबूजींचे नाव #MeToo मध्ये कसे आले?

Birthday Special : अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले, अभिनेत्याच्या हातातून काम गेले.
Published on

बॉलिवूडमधील (Bollywood) सुसंस्कृत बाबूजी म्हणजे अभिनेता आलोक नाथ (Alok Nath) यांचा आज वाढदिवस (Birthday Special) आहे. आलोक नाथ हे एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्यांनी गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमधील अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. बहुतेक चित्रपटात त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे. लोकांना त्यांची वडिलांची भूमिका खूप आवडली आहे. त्यांच्या चित्रपटांच्या यादीमध्ये अनेक बड्या चित्रपटांची नावेही आहेत, ज्यात अग्निपथ, लाडला, साजन का घर, मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, विवाह असे अनेक चित्रपट आहेत. (Alok Nath who has played the role of Babuji in many films was named in the MeToo)

चित्रपटांशिवाय अभिनेत्याने बर्‍याच मोठ्या मालिकांमध्येही काम केले आहे. ज्यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनाबरोबरच त्याच्या घरातही प्रवेश केला आणि अधिकाधिक लोकांच्या मनात स्थान मिळवले. आपल्या मालिकांविषयी बोलताना ते टीव्ही सिरीयल रिश्ते, सपना बाबुल का… विदाई, यहा मै घर घर खेली अशा बर्‍याच मोठ्या मालिकांमध्ये दिसले. याशिवाय त्यांनी आपल्या शोच्या एका सूनशीदेखील भांडण केल्याची चर्चा झाली होती.

Birthday Special: Alok Nath
Bigg Boss 15 टीव्हीपूर्वी होणार OTT वर प्रदर्शित

10 जुलै 1956 रोजी जन्मलेल्या आलोकनाथ यांचा यावर्षी 65 वा वाढदिवस साजरा होत आहे. आलोक नाथ यांचे वडील डॉक्टर होते आणि आई गृहिणी होती. आलोक नाथ यांनी त्यांच्यासारखे डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांचीही इच्छा होती. आलोक नाथ यांचे शालेय शिक्षण आणि पदवी दिल्लीहूनच झाली. महाविद्यालयानंतर त्यांचे मन अभिनयाकडे वाटचाल करू लागले. यामुळे ते महाविद्यालयाच्या रुचिका थिएटर ग्रुपमध्ये दाखल झाले. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तीन वर्षे अभ्यास केला आणि जबरदस्त अभिनयाने नाटकात एंट्री केली. नाटकात मिळालेल्या अभिनय धड्यांमुळे अजूनही आलोक नाथ आपली भूमिका उत्तमरित्या निभावतांना दिसतात.

सूनचा सासरचा संबंध होता

बनीयाद या मालिकेत नीना गुप्ता त्यांच्या सूनेची भूमिका साकारत होती. या शोमध्ये अभिनेता आलोक नाथ हवेली रामच्या भूमिकेत दिसले. त्याचवेळी, घरातील सून रज्जोच्या भूमिकेत नीना दिसली. जरी ही जोडी शोमध्ये सून आणि सासराची भूमिका साकारत होती, परंतु वास्तविक जीवनात दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. ही बातमी अनेक दिवस चर्चेचा विषय राहिली. पण यांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि ते दोघेही वेगळे झाले.

Birthday Special: Alok Nath
माधुरी दीक्षितने अभिनेत्री शगुफ्ता अलीला केली 5 लाखांची मदत

आलोक नाथ यांची बरीच बदनामी झाली

#MeToo चळवळी दरम्यान जेव्हा आलोक नाथ यांचे नाव समोर आले तेव्हा सर्व चाहत्यांना धक्काच बसला. त्यांच्यासारख्या अभिनेत्याचे नावदेखील यात येईल असे कोणालाही वाटले नव्हते. निर्माता विंटा नंदाने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. ही बातमी कळताच त्यांनी स्वत: ला मिडीयापासून दूर केले आणि कुणाशीही बोलले नाही. काही दिवसांनंतर अभिनेत्री दीपिका अमीननेही त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. दरम्यान, अभिनेत्री रेणुका शहाणेने दीपिकाचे भरपूर समर्थन केले. रेणुकाने दीपिकाला जोरदार साथ दिली. ज्यामुळे आलोक यांची बदनामी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com