Haldi Trend Warning Dainik Gomantak
मनोरंजन

सोशल मीडियावरील Haldi Trend धोक्याचा? 'मजा ठरेल कायमची सजा' ज्योतिषांचा गंभीर इशारा; Video Viral

Haldi Trend Danger: हा केवळ एक ट्रेंड नसून, यामुळे नकारात्मक शक्तींना आमंत्रण देत असल्याचा दावा ज्योतिषांनी केलाय

Akshata Chhatre

Haldi Trend Viral Video: सध्या सोशल मीडियावर 'हळदीच्या पाण्याचा ट्रेंड' (Haldi Water Trend) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात हळद टाकणे आणि नंतर तो ग्लास मोबाईलच्या टॉर्चलाइटवर ठेवून अंधाऱ्या खोलीत हळदीचा पाण्यात हळूहळू खाली उतरण्याचा जादुई अनुभव घेण्याचे रील्स अनेक जण बनवत आहेत.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण हा ट्रेंड फॉलो करत असल्याने, 'भारतातली हळद बहुतेक अशीच संपणार' असे उपहासात्मक विनोदही फिरत आहेत. मात्र, या मनोरंजक वाटणाऱ्या ट्रेंडवर एका ज्योतिषाने गंभीर आक्षेप घेतला असून, लोकांना तातडीने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हा केवळ एक ट्रेंड नसून, यामुळे नकारात्मक शक्तींना आमंत्रण देत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

'नकारात्मक शक्तींना आमंत्रण'

ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी या 'हळदीच्या ट्रेंड'वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते सांगतात, "हळदीचा हा ट्रेंड एक नकारात्मक प्रक्रिया आहे. व्यास यांच्या मते, रात्रीच्या अंधारात हा ट्रेंड करून पाहिल्याने नकारात्मक शक्ती तुमच्याकडे आणि तुमच्या घरात आकर्षित होऊ शकतात.

यामुळे शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही टाळता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अशा पद्धतीने हळद पाण्यात टाकल्याने तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरुचे बळ कमी होऊ शकते, ज्यामुळे नशिबावर वाईट परिणाम होतो आणि मानसिक स्थिती बिघडू शकते, असा दावा त्यांनी केला.

व्यास यांच्या मते, ही पूर्णपणे हानिकारक प्रक्रिया आहे, जी घरात आपत्ती आणू शकते. त्यामुळे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. सोशल मीडियावरील क्षणिक प्रसिद्धी किंवा मनोरंजनासाठी कोणतेही ट्रेंड फॉलो करण्याआधी, त्यांचे संभाव्य परिणाम विचारात घेणे महत्त्वाचे आहे, असा संदेश ज्योतिषांच्या या इशाऱ्यातून दिलाय.

(या लेखात नमूद केलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. दैनिक गोमंतक या लेखातील वैशिष्ट्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना समर्थन देत नाही किंवा याची पुष्टी करत नाही.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT