गोव्याची हास्यसम्राज्ञी कन्वी मायनीकर

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

गोव्याची हास्यसम्राज्ञी कन्वी मायनीकर

दैनिक गोमन्तक

दै. गोमन्तकच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यीन) ने आयोजित केलेल्या ‘गोव्याचा हास्यसम्राट’ या स्पर्धेत एका ‘हास्यसम्राज्ञी’नेही आपला ठसा उमटवला. कन्वी मायनीकर (Kanvi Mayanikar) हिला या स्पर्धेत (Competitions) तिसरे पारितोषिक मिळाले. तिच्या स्पष्ट उत्तरांमधून तिचे व्यक्तिमत्त्वही ठामपणे कळून येते.

फारच कमी मुली कॉमेडी क्षेत्रात दिसतात. (गोव्यात तर सहसा नाहीच) आपल्याला कसे वाटले की आपण या क्षेत्रात यावे?

● स्टॅन्डअप कॉमेडी (Standup Comedy) हा प्रकार मी देखील पहिल्याचवेळी सादर केला. त्यात पारितोषिक पटकावणं हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. जोपर्यंत आपण कुठलीही नवीन गोष्ट करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीमागचा खरा आनंद आपल्याला अनुभवायला मिळत नाही. तो अनुभव घेण्याच्या उद्देशानेच मी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. मुली, खासकरून आपल्या “गोव्यातल्या मुली” (Goa) या क्षेत्रात यायला दचकतात आणि जर आल्या तर मुलांप्रमाणे बिनधास्त कॉमेडी (Comedy) करायला त्यांना भीती वाटते. त्यांना मी एवढेच सांगेन की जर पूर्ण तयारीने आणि आत्मविश्वासाने मंचावर पाऊल ठेवलं तर तो मंच तुमचा! कडेला उभं राहून फक्त मुलांना स्टॅन्डअप कॉमेडी करताना पाहण्याऐवजी स्वत:देखील या क्षेत्रात पदार्पण करावं. हे करत असताना सगळेच तुमच्या बाजूने असतील अशी अपेक्षा ठेवू नका कारण त्या गर्दीत मुलांपेक्षा मुलींना हतोत्साह करणारे जास्त असतात.

अशातऱ्हेचे परफॉर्मन्स तुम्ही कधीपासून करता?

● लहान असताना बाबा मला गावात होणारी नाटकं बघायला घेऊन जायचे तेव्हा, स्टेजवरील कलाकारांना कला सादर करताना पाहून आपणही त्यांच्यासारखं काही तरी नवीन सादर करावं असं नेहमी वाटायचं आणि वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायची वेगळी ओढ निर्माण झाली.

तुम्ही कोणाचे मार्गदर्शन घेता का?

● अभिनय क्षेत्रात माझे प्रमुख मार्गदर्शक माझे आई-बाबा आहेत. मी लहान असताना बाबा संहिता लिहून द्यायचे, अभिनय कसा करायचा, वेगवेगळी पात्रे कशी सादर करायची यांवर मार्गदर्शन करायचे. पण अभिनय म्हणजे नेमकं काय याचं मार्गदर्शन श्री विजयकुमारनाईक, मंदार जोग व केतन जाधव यांनी हंस थिएटर्सतर्फे (Theaters) घेतलेल्या नाट्यकार्यशाळेतून मिळालं. कॉलेजमध्ये (College) असताना श्री अभय जोग यांनी घेतलेल्या नाट्यकार्यशाळेतून खूप काही शिकायला मिळालं. मुळात आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष दिलं तर त्या गोष्टीपासूनही शिकता येते.

तयारी कशी करता?

● मला जर एखाद्या स्पर्धेबाबत कळालं तर त्या स्पर्धेचा विषय, त्याच्या नियम व अटी मी आधी जाणुन घेते. दिलेल्या विषयावर वाचन अतिशय महत्वाच आहे असं मी मानते. त्यानंतरमी माझी स्क्रिप्ट तयार करते व त्या विषयाचा सराव करते.

लोकांनी फक्त हसायचं की त्यातून कुठला तरी मॅसेज घ्यायचा ?

● एखादी गोष्ट भाषणापेक्षा स्टॅन्डअप कॉमेडीच्या माध्यमातून, हास्याद्वारे लोकांसमोर मांडली तर त्या गोष्टीचा प्रभाव प्रेक्षकांवर चांगला दिसून येतो.

तुम्ही सध्या काय करता ?

● मी गोवा विद्यापीठात रसायनशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे आणि त्याचबरोबर अभिनय-कला क्षेत्रातदेखील सतत वावरत आहे. पण मला जर अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तर मी त्याला पहिलं प्राधान्य देईल.

आज स्टॅन्डअप कॉमेडियनवर वेगवेगळ्या कारणासाठी बंदी येते आहे किंवा त्यांचे शो कॅन्सल होत आहेत त्यावर तुमचे मत काय?

● लोकांपर्यंत आपले विचार पोहचविण्यासाठी स्टॅन्डअप कॉमेडी (Standup Comedy) हा एक उत्तम मार्ग आहे. स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये आपल्या आसपास होणाऱ्या घटनांवर हास्याद्वारे टिप्पणी केली जाते. स्टॅन्डअप कॉमेडी करताना कलाकाराने ही दक्षता घ्यायला हवी की लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, शक्यतो कुठल्याही समाजावर टीका करू नये किंवा राजकारणात होणाऱ्या घटनांवर थेट टीका करू नये. कलाकाराने ही दक्षता घेऊनसुध्धा जर काही लोक आपल्या स्वार्थापायी स्टॅन्डअप कॉमेडीवर बंदी आणत असतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. स्टॅन्डअप कॉमेडी या कलेला योग्य तो मान मिळायलाचं हवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT