Gangubai Kathiawadi Movie Dainik Gomantak
मनोरंजन

गंगूबाई काठियावाडी ठरलेल्या तारखेलाच होणार रिलीज

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

येत्या 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळला आहे. आलियाचा हा चित्रपट त्याच्या निश्चित वेळापत्रकानुसार प्रदर्शित होणार आहे. वास्तविक गंगूबाईच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले होते. (Gangubai Kathiawadi Movie)

सर्वोच्च न्यायालयाच्या निकलामुळे चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यांना शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये आलियाच्या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहेत.

गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या (Movie) शीर्षकावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, शेवटच्या क्षणी चित्रपटाचे शीर्षक बदलणे शक्य नाही. खटला दाखल करणाऱ्याकडे गंगूबाई दत्तक असल्याचा कोणताही पुरावा नाही. इतकी वर्षे 2011 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाला कोणी आव्हान दिले नाही. आमच्या चित्रपटात गंगूबाईंचा अपमान झालेला नाही, असा युक्तिवाद भन्साळी प्रॉडक्शनचे वकील आर्यमा सुंदरम यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Oil Imports: "अमेरिकेच्या दबावाखाली झुकणार नाही" रशियन तेलाच्या खरेदीवर भारताचे ठाम उत्तर

रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त! वाढत्या अपघातांना जबाबदार कोण?

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

न्‍यायालयांत 60,354 प्रकरणे प्रलंबित, राज्यात 15,392 प्रकरणांवर पाच वर्षांहून अधिक काळ निर्णय नाही

Goa News Live Update: गोव्यात आतापर्यंत पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना २४ कोटी मिळाले; CM सावंत

SCROLL FOR NEXT