संजय लीला भन्साळी यांच्या 'लीला' नावामागची हृदयस्पर्शी कहाणी

'हम दिल दे चुके सनम' दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आयुष्यातील गेम चेंजर चित्रपट
Sanjay Leela Bhansali
Sanjay Leela BhansaliDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. भन्साळी यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1964 रोजी मुंबईत झाला. भन्साळी 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि 'गोलियों की रासलीला राम-लीला' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. भन्साळींचा आगामी चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी' प्रतिक्षेत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Happy Birthday Sanjay Leela Bhansali)

भन्साळी यांचा पहिला चित्रपट

भन्साळी हे बॉलीवूडमध्ये मल्टीटास्कर म्हणून ओळखले जातात, चित्रपट दिग्दर्शक असण्याव्यतिरिक्त, ते निर्माता, संगीत दिग्दर्शक आणि पटकथा लेखक देखील आहेत. भन्साळींना लहानपणापासूनच चित्रपटांच्या दुनियेत नाव कमवायचे होते, त्यामुळे त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी एडिटिंगचा कोर्सही केला. एफटीआयआयमधून फिल्म मेकिंगचा कोर्स केल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. संजयने 1996 मध्ये 'खामोशी' चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांनी 'परिंदा' (1989) आणि '1942: एक प्रेम कथा' (1994) मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 'परिंदा' चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.

Sanjay Leela Bhansali
आलियाने संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात काम करण्यासाठी स्वतःला असे केले होते तयार

भन्साळी हे त्यांच्या आईच्या नावाने ओळखले जातात.

भन्साळी त्यांची आई लीला यांच्या खूप जवळचे होते. त्यांच्या आईचे नाव लीला होते. आई लीला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच त्यांनी आपल्या नावासोबत आई लीलाचे नाव जोडल्याचे सांगितले जाते. म्हणूनच त्यांचे पूर्ण नाव संजय लीला भन्साळी आहे. नावासमोर आई वापरण्यामागची कहाणी खूप हृदयस्पर्शी आहे. असे म्हटले जाते की, बालपणी संजय लीला भन्साळी यांनी अनेक अडचणींचा सामना केला. भन्साळींनाही त्यांच्या आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.कुटुंबाची काळजी घेण्यासाठी संजय यांची आई लीला भन्साळी यांनी संपूर्ण घराची जबाबदारी उचलली. ती स्टेजवर परफॉर्म करून घराचा खर्च उचलायची आणि उरलेला वेळ ती लोकांचे कपडे शिवून मुलांना शिकवायची. संजयची आई लीला भन्साळी यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आणि यामुळेच भन्साळींनी त्यांच्या आईचे नाव आपल्या नावासोबत जोडले. म्हणून त्यांना आज आपण संजय लीला भन्साळी या नावाने ओळखतो.

Sanjay Leela Bhansali
‘क्या ये ठीक है?’ गंगूबाई काठियावाडीवरील चिमुरडीचा रील्स पाहून कंगना म्हणाली...

भन्साळीचे गेम चेंजर चित्रपट

1999 साली आलेला सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय अभिनीत 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट भन्साळींच्या पहिल्या यशस्वी चित्रपटांपैकी एक होता ज्याचे ते निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 1999 मध्ये सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट केला तेव्हा त्याचे नशीब पालटले होते. म्हणून हम दिल दे चुके सनम भन्साळींच्या कारकिर्दीसाठी गेम चेंजर चित्रपट ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com